महाराष्ट्र न्यूज बारामती प्रतिनिधी विनोद गोलांडे
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर वाणेवाडी येथील एका ३४ वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला
असल्याची माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
काल घेतलेल्या नमुने पैकी उर्वरित १७ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये बारामती शहरातील २ व ग्रामीण जगातील ३ असे पाच रुग्ण पॉझिटिव आलेले असून १२ जणांचा अहवाल निगेटिव आलेला आहे बारामती शहरातील आमराई परिसरातील ५९ वयाची महिला व पंचवीस वर्षाचा
तिचा मुलगा पॉझिटिव्ह आलेला आहे तसेच मेखळी येथील ६० वर्षे वयाच्या पुरुष व कांबळेश्वर येतील २९ वर्षे वयाचा तरुण व वाणेवाडी येथील ३४ वर्षांची महिला पॉझिटिव असल्याने सोमेश्वरनगर परिसरात चिंता वाढली आहे.