सातारा : समाजसुधारक केशव सीताराम ठाकरे तथा प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंती निमित्त यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात साजरी करण्यात आली. यावेळी तहसीलदार सर्वसाधारण सुषमा पैकेकरी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.