बारामती ता.०९-: गोवा राज्यात विक्रीस असलेल्या मद्याची अवैध वाहतूक करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथक क्र २ ने पकडला…
सुनिल निंबाळकर / बारामती प्रतिनिधी
गोवा राज्यात विक्रीस असलेल्या मद्याची अवैध वाहतूक करणारा ट्रक निरा ता . पुरंदर येथे राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथक क्र २ ने पकडला आहे . सुमारे ४८० बॉक्स असलेली अवैध दारु व ट्रकसहीत सुमारे एकोण पन्नासलाख रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन विभागाने ताब्यात घेतला असून आरोपीना ताब्यात घेऊन सासवड कोर्टात हजर केले असल्याची माहीती दुय्यम निरीक्षक विकास थोरात यांनी दिली .
गोवा राज्यात परवानगी असलेली दारु घेऊन जाणारा ( ट्रक क्र एम. एच. १८ ए.ए . ८३५५ ) सातारा रस्त्याने येत असल्याची माहीती राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथक क्र २ ला समजली . यानंतर पुणे विभागाचे विभागीय आयुक्त प्रसाद सुर्वे ,व अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गक्रमणाखाली भरारी पथक क्र २ चे दुय्यम निरीक्षण विकास थोरात , एस .के. कानेकर ,सतीश ईंगळे ,प्रशांत धाईंजे, गणेश नागरगोजे ,संतोष गोंदकर, जवान एस बी मांडेकर, नवनाथ पडवळ , केशव वामने , बी. आर. सावंत महीला जवान मनीषा भोसले यांनी सापळा रचला .
पुरंदर निरा गावच्या हद्दीत निरा – लोणंद रस्त्यालगत ट्रक थांबण्याच्या सुचना देण्यात आल्या . ट्रकसोबतच मारुती कंपनीची ईको गाडी क्र जी जे १ के वाय ९८४८ असल्याची ट्रक ड्रायव्हरने सांगितले . ट्र्कची तपासणी केली असता ट्रकमध्ये प्रथम दोनशे लिटरचे मोकळे बॅलर आढळून आले . अधीक तपासणी केली असता ट्रकमध्ये बॅलरच्या मागील बाजुला रॉयल ब्लॅक व्हीस्की ३० बॉक्स , इम्पेरियल बल्यू व्हीस्कीचे २७५ बॉक्स, ऱॉयल चॅलेंजरचे ५० बॉक्स , ट्युबर्ग स्ट्रॉंग प्रीमिअम बियरचे ७५ बॉक्स , किंग फिशर स्ट्रॉंग प्रीमियमचे ५०० मिली क्षमतेचे ५० बॉक्स असे एकूण ४८० बॉक्स आढळुन आले . यानंतर राजेश लक्ष्मण लोहार , वय वर्षे ४२ मुं .पो. हिसाळे ,जिल्हा धुळे , सुखविंदरसिंग मलकितसिंग ओजला , वय वर्षे २५ कर्तापुर , ता. घमेला , जि जालंधर पंजाब , राजु सुरसिंग सोलंकी , वय वर्षे ३६ रा . गायत्री आश्रम जांभली ता . शेंदवा जि बडवाणी मध्यप्रदेश व शैलेशकुमार रामकृष्ण कौरी वय २५ वर्षे रा .अहमदाबाद , गुजरात यांना ताब्यात घेतले . वाहन व मुद्देमालासहीत एकूण ४९०९६०० रुपयांचा मुद्देमाल आरोपींना सासवड न्यायालयात हजर केले आहे .