महाराष्ट्र न्यूज बारामती प्रतिनिधी दिगंबर पडकर
बारामती तालुक्यात आज तपासणी करण्यात आलेल्या ६४ रुग्णांपैकी ७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
काल एकूण ६९ स्बँव नमुने तपासणीसाठी घेतले होते.त्यापैकी एकूण ६४ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून पाच जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. प्राप्त झालेल्या अहवालांपैकी बारामती शहरातील दोन व भिकोबा नगर येथील एक असे तीन रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत. बारामती शहरांमध्ये ६६ वर्षीय बागवान वस्ती जळोची येथील पुरुषाचा तसेच आमराई परिसरातील ६४ वर्षीय इसमाचा व भिकोबा नगर येथील यापूर्वी पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीच्या पत्नीचा (५४ वर्षे) अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. असे एकूण ६४ पैकी आज बारामती मध्ये ७ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.