पांचगणी : घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय राज्य सल्लागार समितीमध्ये पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांची निवड झाली. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
देशातील सर्व शहरे पूर्णपणे स्वच्छ निरोगी आणि राहण्यायोग्य करणे शहरातील गरीब आणि महिलांच्या आरोग्य विषयक व स्वच्छते विषयकबाबींकडे विशेष लक्ष केंद्रित करून सर्व नागरिकांना स्वच्छ व चांगले आरोग्य आणि पर्यावरण मिळावी याकरिता केंद्र शासनाच्या पर्यावरण, वण व वातावरण बदल मंत्रालयाने यापूर्वी अस्तित्वात असलेले नागरी घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम 2000 अधिक्रमित करून एप्रिल 2016 मध्ये घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 अधिसूचित केले आहेत.या राज्यस्तरीय राज्य सल्लागार समितीमध्ये पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांची निवड झाली आहे. याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.