महाराष्ट्र न्यूज जळोची प्रतिनिधी दिगंबर पडकर
उद्या पासुन कडक कारवाई, बारामती शहर पोलीसांचा इशारा. बारामती शहरात उद्यापासुन चारचाकी वाहनांमध्ये १+२ व्यक्ती पेक्षा जास्त प्रवासी तसेच मोटार सायकलवर डबलसीट फिनार्यांवर कडक कारवाई होणार आहे.
बारामती शहरात तसेच तालुक्यामध्ये कोरोना विषाणु संक्रमित रूग्ण सापडत असुन कोरोना रोगाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन कोरोना विषाणु प्रतिबंध नियमावली प्रमाणे बारामती शहर पोलीस स्टेशन व बारामती नगरपरिषद मिळुण संयुक्त रित्या उद्या दिनांक २३/०७/२०२० रोजी पासुन विना मास्क फिरणे ,चाकी वाहनांमध्ये १+ २ व्यक्ती या पेक्षा जास्त व्यक्ती असणे तसेच मोटार सायकलवर डबलसीट फिरणारे यांचेवर कडक कारवाई करणार असले बाबत बारामती उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी निवेदनाद्वारे माहिती दिली आहे.
तरी बारामती शहरातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, उदया दिनांक २३/०७/२०२० रोजी पासुन कोणीही विना मास्क फिरणार नाही.अथवा चारचाकी वाहनामध्ये १+२ व्यक्ती पेक्षा जास्त व्यक्ती बसवणार नाही.अगर मोटार सायकलवर कोणीही डबलसीट फिरणार नाहीत.जर कोणी असे नियम मोडताना आढळुण आल्यास त्याचेवर स्थानिक स्वराज्य संस्था यांचे वतीने प्रचलित कायदयांन्वे योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.असे आवाहन शिरगावकर यांनी केले आहे.