महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :बिलकिस शेख (लोणंद )
कै. आनंदा सुर्यवंशी,संस्थापक मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था यांच्या दि. 5 ऑगस्ट राजी 66 व्या जयंतीनिमित्त कै आनंदा सुर्यवंशी चॅरिटेबल ट्रस्ट व मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था पाडेगाव.ता.खंडाळा.जि. सातारा यांच्यावतीने पाडेगाव येथिल कोविड केअर सेंटर येथील डॉक्टर,नर्स व कार्यरत कर्मचारी यांना संस्था व ट्रस्ट यांच्यावतीने सॅनिटाईजर, मास्क व ग्लोजचे वाटप लोणंद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री हेमंत ढोकले, लोणंद पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संतोष चौधरी, पी एस आय श्री माने, लोणंद PHC चे डॉ प्रशांत बागडे, डॉ अमित पवार, लोणंद मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ मिलिंद काकडे-पाटील, सचिव डॉ राहुल क्षिरसागर, खजिनदार डॉ अवधूत किकले, डॉ अविनाश शेळके-पाटील, समाजकल्याण सातारा कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक श्री मुकुंद गुरव, संस्था व ट्रस्टच्या अध्यक्षा सौ चैत्राली सुर्यवंशी, उपाध्यक्षा श्रीमती विमल सुर्यवंशी व सचिव श्री पवन सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच कोविड केअर सेंटर मधील दाखल सर्व व्यक्ती व कर्मचारी यांना जेवणाची सोय करण्यात आली.या कार्यक्रमाला समता माध्यमिक आश्रमशाळेचे प्र. मुख्याध्यापक श्री उत्तम माने, श्री नामदेव बिजले, श्री बाबुराव काकडे, श्री साईनाथ चाटलवार, श्री गणेश शेडगे, श्री राहुल राठी, श्री दीपक वाघमारे,श्री सुनिल भोसिकर ,श्री संजय सुर्यवंशी, श्री तानाजी खुडे,श्री देवराम देवाचे,श्री विकास पाटोळे, श्री सचिन दुधाळ व इतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विजय गेजगे यांनी केले तर आभार संस्था व ट्रस्टचे सचिव श्री पवन सुर्यवंशी यांनी मानले.