महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :पाचगणी
पाचगणी पोलीस ठाण्यात कोरोना ने शिरकाव केला असून काल रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात पोलीस ठाण्यातील ऐका बड्या अधिकाऱ्यांसह पाच जणांचे अहवाल कोरोना बाधित आल्याने व कोरोना योध्यानाच कोरोनाने गाठल्याने ऐकच खळबळ उडाली आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पाचगणी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीचा दिवस करीत पाचगणी शहरं व परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. लॉकडाऊन काळात तर या कर्मचाऱ्यांनी अगदी उपाशी पोटी ही बंदोबस्त ठेवत पाचगणी व परिसर अबाधित ठेवला होता त्यावेळी पाचगणी शहरातील काही सामाजिक संघटना सेवाभावी संस्थांनी त्यांना मदतीचा हात दिला होता.
कोरोना योध्याची भूमिका बजावणाऱ्या आणि शहरात बंदोबस्त कडक ठेवणाऱ्या या योध्याना कोरोना संसर्ग झाल्याने पांचगणीतील नागरिक त्यांना या संकटातून सुखरूप बाहेर येण्यासाठी प्रार्थना करीत आहेत.