महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी / माण : संतोष सुतार
माण-खटाव तालुक्यातील चारा छावणीतील भ्रष्टाचार प्रकरणी जिल्हाधिकारी सातारा, पोलिस अधिक्षक सातारा यांचेकडे गेली अनेक महिने तपास करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करणेची लेखी मागणी व तक्रारी दाखल करुन देखील या प्रकरणाकडे जाणूनबूजून कानाडोळा करत दुर्लक्षित करण्यात आले.
यामुळेच दहिवडी, ता.माण येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो. यांचे कोर्टात भा.द.वि कलम ४२०,४०९,४०६,४०८,४६७,४६८,२०१,१२०/बी प्रमाणे मी विरुध्द (१) बाई सर्जेराव माने – तहसिलदार माण (२) नंदकिशोर महाडिक -मंडलाधिकारी (३) युवराज एकनाथ बोराटे-तलाठी बिजवडी (४) नितीन बबन सोनवलकर -ग्रामसेवक बिजवडी (५)शिवाजी पांडूरंग गावडे -कृषी सहाय्यक (६) यशवंत नामदेव शिनगारे -चेअरमन वि.का.सेवा.सह.सोसा बिजवडी (७) विकास दिनकर भोसले -सचिव ,वि.का.सेवा.सह.सोसा.
बिजवडी या अ.नं.क्र. १ ते ७ यांचेवरती १५६(३) प्रमाणे गुन्हे दाखल करणेत यावेत अशी फिर्याद दाखल केली होती.
न्यायदंडाधिकारी मा.अमितसिंह मोहने यांनी ६/३ /२०२१ च्या केलेल्या आदेशाने संशयित आरोपी क्र ६ व ७ यांचेवरती गुन्हे दाखल करणेचा दहिवडी पोलिसांना आदेश झालेला असून ,आरोपी क्र १ ते ५ हे सरकारी नोकर असून कलम १९७ अन्वये या प्रकरणाच्या तपासामध्ये यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष काही संबंध दिसून आलेस त्यांचे वरीष्ठ कार्यालयांची परवानगी घेऊन अ.क्र १ ते ५ यांचेवरती गुन्हे दाखल करणेत यावेत असे आदेश करणेत आले आहेत. या फिर्यादीचे काम अॅड. नितीन गोडसे (वडूज) व अॅड.मिनेश पाटील (दहिवडी ) यांनी पाहीले.
आरोपी क्र १ ते ५ यांचेबाबत माझेकडे कागदोपत्री कायदेशीर सबळ पुरावे असून, चारा छावणीतील भ्रष्टाचार प्रकरणामध्ये ईतरही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष हात असलेले अधिकारी व सर्व संस्था यांच्यावरती गुन्हे दाखल करणेत यावेत यासाठी विशेष व वरिष्ठ न्यायालयामध्ये दाद मागणार आहे. जेणेकरुन या प्रकरणाचा उलघडा होऊन बडे मासे जाळ्यात अडकून भ्रष्टाचाराचा भांडाफोड होतानाच बिमोड होण्यास मदत होईल असे निवेदनामध्ये सरतेशेवटी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी म्हटले आहे.