सोमवार दि. 10 ऑगस्ट रोजी सातारा जिल्हा परिषद अंतर्गत विनंती बदल्या
महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी फलटण सातारा जिल्हा परिषद अंतर्गत विनंती बदल्या सोमवार दि. 10 ऑगस्ट रोजी यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह जिल्हा परिषद सातारा येथे होणार असल्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी एका पत्राद्वारे जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांना कळविले आहे. 7 ऑगस्ट अखेर विनंती बदल्याचे अर्ज, यादी मागविण्यात आली होती. त्यानुसार प्राप्त अर्जदारांची यादी व जिल्हा अंतर्गत बदली साठी निव्वळ रिक्त पदांची यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच ई-मेल व व्हाट्सअप द्वारे जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांना कळविण्यात आलेली आहे .गटशिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर सर्व संबंधित शिक्षकांच्या निदर्शनास ही बाब आणून द्यावयाची आहे. नव्याने अर्ज करण्यासाठी आठ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच पर्यंत मदत देण्यात आली होती. यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही असे त्या पत्रात सूचित करण्यात आलेले आहे .अवैध किंवा चुकीचे अर्ज पाठवल्यास त्याची जबाबदारी संबंधित गटशिक्षण अधिकारी यांच्यावर राहणार आहे अशा आशयाचे पत्र प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रतिभा कोळेकर यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी यांना पाठवलेले आहे