सोलापूरच्या भूमीतून ११ जणांना यश. सोलापूरसाठी गौरव …
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : प्रतापसिंह भोसले (फलटण शहर)
UPSC परीक्षा उत्तीर्ण सोलापूर जिल्ह्यातील सहा यशस्वीत्यांचा सत्कार आज रोजी सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहावर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर कार्याध्यक्ष संतोषभाऊ पवार यांच्या प्रमुख आयोजनात पार पडला.
सोलापूर जिल्ह्यातील ११ उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी शशांक माने (Rank 743), राहुल चव्हाण (Rank 109), भैसारे शुभम (Rank 749), अजिंक्य विद्यागर (Rank 789), अश्विनी वाकडे (Rank 200), अविनाश जाधवर (Rank 433) यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार त्यांच्या पूर्ण कुटुंबीयांसमवेत करण्यात आला .कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख आयोजक कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले व कार्यक्रमाचे प्रयोजन सांगितले . राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्हा पालक मंत्री भरणे यांनी यशस्वीत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन तर केलेच परंतु भविष्यातील त्यांच्या जडण घडणीसाठी शुभेच्छा देखील दिल्या .
यावेळी सोलापूरचे पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील (IPS) यांनी मार्गदर्शनपर भाषणात भविष्यातील अधिकाऱ्यांना त्यांचे अनुभव कथन करताना भविष्यात घ्यावयाची काळजी तसेच अधिकारी झाल्यानंतर करावयाचे कार्य , समाजाप्रती मदतीची भावना बाळगून त्या बाबतीत कोणतीही मदत लागली तर ती करण्यास तयार असल्याचे सांगितले . सोलापूरचे जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांनी देखील यशस्वीत्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना मार्गदर्शन केले .
यावेळी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करताना आदरणीय पालकमंत्री तसेच प्रशासकीय अधिकारी यांचे आभार मानले व भविष्यात अधिकारी झाल्यानंतर समाजोपयोगी कार्य आमच्या हातून उत्तमरित्या पार पडतील असे आश्वासन दिले .यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचे कुटुंबीय , राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर गटनेते श्री किसन जाधव , वैरागचे राष्ट्रवादीचे नेते श्री निरंजन भूमकर , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष जुबेर बागवान , सोशल मीडियाचे मिलिंद गोरे , प्रमोद भोसले , युवराज माने , श्यामभाऊ गांगुर्डे , अतुल लोंढे , बसवराज कोळी , निशांत सावळे , शिवराज विभुते आदी प्रमुख पदाधिकारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते .