महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी फलटण
देशभरातील भारत गॅस एलपीजी ग्राहक व्हॉट्सअॅपवर किंवा मिस्ड कॉल देऊन एलपीजी सिलिंडर बुक करू शकतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत पेट्रोलियमने देशभरातील सुमारे सात कोटींहून अधिक ग्राहकांना भारत गॅस सिलिंडर बुकिंग सुविधा सुरु केली आहे.
बीपीसीएल कॉर्पोरेटचे डिजीटल संचालक अरुण सिंह यांनी ही माहिती दिली. राज्यासह देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मच्या मदतीने ग्राहकांना तात्काळ सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. बीपीसीएल ग्राहकांना 6 हजार 111 मोठ्या वितरक नेटवर्कद्वारे सिलिंडरचे वितरण करते. ग्राहकांसोबत संवाद साधण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा अवलंब करण्यात येत आहे. भारत पेट्रोलियमला एलपीजी डिलीव्हरी ट्रॅकिंग, सुरक्षा जागरूकता निर्माण करणे आणि ग्राहकांचा अभिप्राय घेणे शक्य होणार आहे, असे सिंह यांनी सांगितले. व्हॉट्सअॅपवरून बुकिंगची प्रक्रिया –
भारत गॅस नोंदणीकृत मोबाईल 1800224344 क्रमांकावर ‘बुक’ किंवा ‘1’ पाठवा.