नागठाणे गावातील 30 मंडळाचा आदर्शवत निर्णय
ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाला गावातील सर्व गणेश मंडळा कडून सहकार्य.
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी- राहुल ताटे पाटील
सातारा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिसंवेदनशील असणारे पंचक्रोशीतील मुख्य बाजारपेठेचे आणि सर्व साधारण आठ ते दहा हजार लोकसंख्या असणाऱ्या नागठाणे या गावांमध्ये कोरोना परिस्थितीमध्ये घेतलेल्या एक गाव एक गणपती या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्याला एक नवीन आदर्श घालून दिला आहे. संपूर्ण देशभरामध्ये कोरोना संसर्गाचा वाढता प्रसार पाहता येत्या काही दिवसांमध्ये प्रत्येक तरुणांचा उत्साहाचा गणपती चा सण येत असून कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गर्दी करणे टाळणे यासाठी ग्रामपंचायत नागठाणे आणि पोलीस प्रशासन यांच्या वतीने ग्रामपंचायत नागठाणे याठिकाणी सर्व तरुण मित्र मंडळ यांचे पदाधिकारी यांच्यामध्ये चर्चा झाली असता सर्व गणेश मंडळांनी या वर्षी गणेशोत्सव एक गाव एक गणपती करण्याचा एक मताने निर्णय घेतला.
ग्रामदैवत श्री चौंडेश्वरी माता मंदिर या ठिकाणी गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करून प्रत्येक मंडळातील ठरवून दिलेल्या या दिवशी पाच सदस्यांनी मनोभावे पूजा अर्चा करावी हा निर्णय घेण्यात आला.यावेळी बोरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री सागर वाघ, नागठाणे ग्रामपंचायतीचे सरपंच
श्री. विष्णू साळुंखे पाटील, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन श्री संजय साळुंखे, पोलीस पाटील श्री रमेश साळुंखे, श्री. राजेंद्र साळुंखे, श्री, संतोष साळुंखे, श्री शंकर सुतार, श्री अमीन शिकलगार, व सर्व मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित होते.
*नागठाणे गावातील 30 गणेश मंडळ यांचा आदर्शवत निर्णय*
राजकीय दृष्ट्या अतिसंवेदनशील असणाऱ्या गावांमध्ये एकूण 30 गणेश मंडळे असून सर्व गणेश मंडळांनी घेतलेल्या एक गाव एक गणपती या निर्णयाचे सर्व स्तरावरून स्वागत होत असून अशा प्रकारचा निर्णय प्रत्येक गावांमध्ये होणे गरजेचे आहे. श्री विष्णू साळुंखे-पाटील – सरपंच ग्रामपंचायत नागठाणे