अहमदनगर प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्ष पदी अशोकराव उगले यांची फेर निवड करण्यात आली असून कार्याध्यक्ष पदी दत्ता जाधव सर,सचिव पदी अनिल नाईकवाडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.तर संघाचे माजी सचिव विद्याचंद्र सातपुते यांच्या कामाची दखल घेत त्यांची अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
अकोले येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या अध्यक्षतेखाली व जेष्ठ पत्रकार रामलाल हासे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या सभेमध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अकोले तालुका कार्यकरिणीची निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली.
यावेळी जिल्हा अध्यक्ष अनिल रहाणे. जिल्हाप्रसिद्दी प्रमुख पदी भाऊसाहेब वाकचौरे , उपाध्यक्ष पदी हरीभाऊ फापाळे, ललित मुतडक, वसंत सोनवणे,सहसचिव पदी दत्ता जाधव (अंबड), खजिनदार पदी सुरेश देशमुख, प्रसिद्धी प्रमुख पदी सुनील शेणकर,संपर्क प्रमुख पदी जगन्नाथ आहेर,तालुका वृत्तवाहिनी प्रमुख पदी संजय टिकेकर,पत्रकार हल्ला विरोधी प्रमुख पदी शंकर संगारे, सांस्कृतिक प्रकल्प प्रमुख पदी निलेश वाकचौरे,शैक्षणिक प्रकल्प प्रमुख पदी सचिन लगड, सोशल मिडिया प्रमुख पदी गणेश रेवगडे,मुळा विभाग प्रमुख भागवत खोल्लम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी जेष्ठ मार्गदर्शक म्हणून जेष्ठ पत्रकार रामलाल हासे व हरीभाऊ आवारी यांची निवड करण्यात आली.तर कायदेविषयक सल्लागार म्हणून ऍड.राम भांगरे व ऍड.भुषण आवारी यांची निवड करण्यात आली.
यावेळी राज्य संघटक विश्वासराव आरोटे म्हणाले की, तालुक्यातील सर्व पत्रकार हे आपलेच असून कोणालाही दुखविण्याचा प्रयत्न करू नये.राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची प्रतिमा ही राज्यातच नव्हेतर देशात चांगली आहे. पत्रकार संघाच्या प्रयत्नाने राज्यात पत्रकार संरक्षण कायदा संमत झाला आहे.कोरोनाच्या काळात मृत्यू पावलेल्या 325 पत्रकारांना प्रत्येकी 5 लाख रुपये आर्थिक मदत करण्याचे ठरले आहे.त्यामद्धे तो कोणत्या पत्रकार संघाचा सदस्य आहे असा संकुचित विचार केलेला नाही.पूरग्रस्त नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आलेली आहे.तर पत्रकार संघाच्या सदस्यांचा अपघाती विमा उतरविण्यात आला आहे,व बाकी सदस्यांचा लवकरच अपघाती विमा उतरविण्यात येणार आहे. पत्रकार संघाच्या विविध कार्याचा आढावा घेत श्री आरोटे यांनी तालुका कार्यकारिणीने विभागवार उपक्रमाचे आयोजन करावे,दरमहा मीटिंग घेऊन त्याच दिवशी एखाद्या शाळेला काही मदत करता येईल का याचे ही नियोजन करावे.सर्वाना ओळखपत्र देण्यात यावे.टीका करण्याकडे लक्ष न देता आपले काम करीत राहावे. कामातूनच टीकाकारांना उत्तर द्यावे.असे आवाहन केले
यावेळी सर्व पदाधिकारी यांचा शाल,गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जेष्ठ पत्रकार हेमंत आवारी,निलेश भागडे,ओंकार अस्वले,भागवत खोल्लम,निलेश सहाणे,रजिस्टर निखिल भांगरे हे उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक विद्याचंद्र सातपुते यांनी केले तर आभार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मानले.




















