ईश्वरकृपा टायर सर्व्हिसचा शुभारंभ संपन्न
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर)
इंदापूर तालुक्यातील पुणे – सोलापूर हायवेला इंदापूर शहरात बायपासलगत मंगेश मच्छिंद्र लवटे यांनी ‘ईश्वरकृपा टायर्स सर्व्हिस’ या नव्याने सुरू केलेल्या व्यवसायाचे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती , जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने यांच्या शुभहस्ते उदघाटन करण्यात आले .
पंक्चर व ग्रीसिंग या दोन्ही सुविधा लवटे यांनी आपल्या ग्राहकांना याठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत . आपल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी या व्यवसायाला केलेली सुरवात ही , हाती घेतलेले कुठलेही कार्य तडीस नेण्याचे लवटे यांच्या ठायी असणारे गुण , त्यांना नक्कीच यशस्वी करतील , असे मत प्रविण माने यांनी उदघाटन समयी व्यक्त केले. व नवीन सुरू केलेल्या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या .
या उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी मंगेश यांचे वडील मच्छि़ंद्र लवटे , यशवंत लवटे , नामदेव लवटे , सचिन लवटे , संदीप लवटे , लवटे कुटुंबिय व आदी सहकारी मान्यवर उपस्थित होते .
































