महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :शहाजीराजे भोसले कळंब – इंदापूर)
केंद्र सरकारच्या वतीने २६ जानेवारी २०२१ रोजी जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी राज्यातील मान्यवरांची नावाची शिफारस करण्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी “केंद्र शासनाला पद्म पूरस्कार सन २०२१ करीता नावे सुचविण्यासाठी शिफारस समिती ची स्थापना”केली आहे , त्याचा शासन आदेश सरकारने काढला आहे ,या समितीत इंदापूर चे आमदार व पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे याची नियुक्ती केली आहे .
या समितीचे राज्याचे राजशिष्टाचार व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे अध्यक्ष असतील तर सदस्यपदी उद्योग व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई ,क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार , सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत , माहिती व जनसंपर्क मंत्री श्रीमती अदिती तटकरे , सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे , तर या समितीचे सदस्य सचिव म्हणून सामान्य प्रशासन (राजशिष्टाचार) विभागाचे प्रधान सचिव असतील , या प्रमाणे समिती गठीत केली आहे .