महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी गणेश पवार:
महाराष्ट्र राज्य साखर कामगार युनियन प्रतिनिधी मंडळाची फलटण तालुका साखर कामगार युनियन ची निवडणूक प्रक्रिया दिनांक १४ ऑगस्ट रोजी पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी आम्ही नवनियुक्त कौन्सिल मेंबर यांची बैठक बोलावली होती मात्र जुन्या प्रतिनिधिक मंडळाच्या सदस्यांनी औद्योगिक न्यायालय सातारा या ठिकाणी दाखल केलेल्या याचिकेवर स्थगिती आणावी अशी मागणी केली असता यावर न्यायालयाने स्थगिती दिली नसून आम्ही स्वतः या सर्व प्रक्रियेला वेळ मिळावा म्हणून आमच्या वकिलामार्फत दहा दिवसाची मुदत वाढवून घेतली असून त्या नंतर आम्ही या निवडीची प्रक्रिया राबवणार असून याच्यावर न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिली नसल्याची माहिती फलटण तालुका साखर कामगार युनियनचे अध्यक्ष प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनी दिली.