गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज प्रचंड व्हायरल झाला आहे. एखादा मेसेज अथवा लिंक फॉरवर्ड करताना संबंधित मेसेजची खातरजमा करून घेणं महत्त्वाचं असतं. परंतु टाटा ग्रुपबाबत चुकीचा संदेश असणारा मेसेज व्हाफलटण यरल करण्यात येत आहे. नेमकं हा मेसेज काय आहे आणि या मेसेज मागचे व्हायरल सत्य काय आहे ?
टाटा ग्रुपने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया साईटवर कुठलीही लिंक फॉरवर्ड न करण्याचा आग्रह केला आहे. यात सांगितलं गेले आहे की, टाटा ग्रुप सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या कुठल्याही अपप्रचारासाठी जबाबदार राहणार नाही. या व्हायरल पोस्टमध्ये टाटा समुहाच्या १५० वा वर्धापन दिनानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना विजयी झाल्यास कार बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. या व्हायरल मेसेजसोबत एक लिंकही देण्यात आली आहे.
व्हायरल होणाऱ्या मेसेजबाबत टाटा ग्रुपकडून अधिकृतपणे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. टाटाच्या वेबसाईटवर अशा कुठल्याही प्रकारच्या कार्यक्रमाची माहिती नाही. टाटा ग्रुपने सांगितले आहे की, या प्रमोशनल एक्टिविटीसाठी टाटा ग्रुप अथवा त्यांची कंपनी जबाबदार राहणार नाही. कृपया या लिंकवर क्लिक करू नका आणि दुसऱ्यांनाही अशाप्रकारे बनावट मेसेज पाठवू नका. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा मेसेज पूर्णपणे चुकीचा असून कुणीही त्याला बळी पडू नये असे सांगण्यात आले आहे.
फलटण : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज प्रचंड व्हायरल झाला आहे. एखादा मेसेज अथवा लिंक फॉरवर्ड करताना संबंधित मेसेजची खातरजमा करून घेणं महत्त्वाचं असतं. परंतु टाटा ग्रुपबाबत चुकीचा संदेश असणारा मेसेज व्हायरल करण्यात येत आहे. नेमकं हा मेसेज काय आहे आणि या मेसेज मागचे व्हायरल सत्य काय आहे ?