महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (इंदापूर): शहाजीराजे भोसले
मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील व जेष्ठ नेते बळीराम साठे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ मतदार संघात वडवळ, रामहिंगणी,विरवडे, मुंढेवाडी, पोफळी, कोळेगाव या भागातील रेल्वेच्या अत्यारीत येणारे भूसंपादन प्रश्नासंबंधी शेतकरी यांच्या अडचणी संदर्भात सोलापूर येथे भूसंपादन उपजिल्हाधिकारी शैलेश सुर्यवंशी यांच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पंचायत समितीचे सदस्य अजिंक्यराणा पाटील, सज्जन पाटील यांसह शेतकरी उपस्थित होते.
यावेळी आमदार यशवंत माने यांनी कार्यालयातून थेट संबंधित रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी यांना फोनव्दारे संवाद साधत शेतकरी यांना योग्य मोबदला देत मदत करण्याची भूमिका मांडली आणि रेल्वे खात्याने सकारात्मक प्रतिसाद देत अवघ्या तासाभरात रामहिंगणी आणि मुंढेवाडी या दोन गावांसाठी रूपये १,३७,०५,७३३
( एक कोटी सदतीस लाख पाच हजार सातशे तेहतीस रूपये ) तात्काळ मंजूर केले. येत्या काळात लवकरच उर्वरित गावांसाठीही निधी मंजूर करण्यात येईल, असे आश्वासन उपजिल्हाधिकारी शैलेश सुर्यवंशी यांनी आमदार यशवंत माने यांना दिले आहे .