महाराष्ट्र न्यूज प्रतिनधी :श्रीगणेश गायकवाड (पाटण)
कोयना नदीला आलेल्या पूराचे पाणी पाटण शहरातीलनदीकाठावर असणाऱ्या घरांमधून शिरु लागले आहे. कोयना धरणातूनसोडण्यात आलेल्या पाण्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली
असतानासुरक्षिततेच्या कारणास्तव नदीकाठावर राहणार्या कुटुंबांना पाटणनगरपंचायतीने सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. कोयना धरण परिसरातपाऊस कायम चालू असून धरणात प्रतिसेकंद ५६ हजार ९०३ क्युसेक्सपाण्याची आवक होत आहे. तर धरणातील पाणीसाठा ९३ टि.एम.सी.झाला आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सहा वक्रदरवाजे १० फुटांवरच असून नदीपात्रात ५६ हजार ९०३ क्युसेक्स विसर्गसुरू आहे. या पाण्याने कोयना नदी दुथडी भरून वाहत असताना नेरळे,मुळगाव पुल आज दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली आहेत.नेरळे पुलावरून कोयना नदीचे पाणी वाहत असताना मोरगिरी भागाचातर मुळगाव पुल पाण्याखाली गेला असताना कवरवाडी, मुळगाव, त्रिपूडी,चोपडी, बेलवडे, पिंपळगाव या गावांचा पाटण शहराशी संपर्क तुटला आहे.
कोरोनाच्यासंकटात पूराची भिती निर्माण झाल्याने ऐन गणपती – गौरी उत्सवाच्यातोंडावर जनजीवन विस्कळित झाले आहे. अशा परिस्थितीतनदीकाठावरील गावातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावेतर सुरक्षित असलेल्या नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असेआवाहन प्रशासकीय यंत्रणेने केले आहे.पाटण शहरात कोयना नदीला आलेल्या पूराच्या पाण्यामुळे केरा नदीलानिर्माण झालेल्या पाण्याच्या फुगीने मार्केट यार्ड शेजारी असणाऱ्याभातगीरणीला व तेथील काही घरांना पाण्याचा वेढा पडला आहे. तरकोयना काठावर असलेली स्मशानभुमिला देखील पूराचे पाणी लागलेआहे. या परिसरातील कुटुंबांना पाटण नगरपंचायतीने सुरक्षित ठिकाणीस्थलांतरित केले आहे.कोयना धरणात सध्या ९३ टि.एम.सी. पाणी साठा झाला आहे. धरणाचीपाणी पातळी २१५३.११ इंच तर ६५६.५१४ मीटर झाली आहे. धरणातयेणार्या पाण्याची आवक ५६ हजार ९०३ इतकी असुन धरणाचे सहा वक्रदरवाजे १० फुटांवर उचलून नदीपात्रात प्रतिसेकंद ५६ हजार ९०३क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या चौवीस तासात कोयना- २४१मि.मी. (३४५९), नवजा- १७१ मि.मी. (३९४२), महाबळेश्वर- २४७ मि.मी.(३८९८) पावसाची नोंद झाली आहे.
कोरोनाच्या संकटात पूराची भिती ..गेल्यावर्षी २०१९ ला जुलै औगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे कोयनानदीला महापूर परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे कोयना धरणाचेसहा वक्र दरवाजे विक्रमी २२ फुटांवर उचलून नदीपात्रात सरासरी एकलाख चाळीस हजार क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत होते. यापूर परिस्थिती मुळे कोयना काठ अक्षरशः पाण्यात बुडाला होता. पाटणसह अनेक गावांत पाणी शिरले होते. मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली.नागरिकांचे हाल हाल झाले. या बरोबरच कृष्णा काठावरील साताराजिल्ह्यातील कराड तालुका, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला पूराचा मोठाफटाका बसला होता. हि भिती नागरिकांच्या मनात अजूनही कायमअसताना आता पुन्हा एकदा चालू वर्षी देखील कोयना नदीला पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे कोरोनाच्या संकटात पूराची भितीनिर्माण झाली आहे.