सातारा येथे कार्यरत असणारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलीपे यांचा मनमानी कारभार व मोगलाई गेले वर्षभर सातारा जिल्ह्यामध्ये चालू असून त्याचा प्रत्येक नुकताच आज नऊ ऑक्टोबर रोजी आला, पाटण तालुक्यातील मुरुड प्राथमिक आरोग्य केंद्रात श्री मधुकर पवार आरोग्य सहाय्यक कार्यरत असून ते त्यांचे सेवा इमाने इतबारे करीत आहेत गेल्या महिन्यामध्ये डॉक्टर खलीपे यांनी श्री मधुकर पवार यांचे वेतन रोखलेले आहे यापूर्वीही बऱ्याच कर्मचाऱ्यांचे जिल्ह्यामध्ये वेतन रोखलेले आहेत आज दिनांक 9 ऑक्टोबर 24 रोजी मधुकर पवार यांची आई आजारी असल्याने ते रजेवर होते त्यांना त्यांच्या वैयक्तिक मोबाईलवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलीपे यांचा फोन गेला व त्यांना डॉक्टर खलीपे त्यांच्याकडून शिवीगाळ करण्यात आली तसेच तुझ्या आईला घोडा लावतो तुझी विभागीय चौकशी लावतो अशी धमकी दिल्याने मधुकर पवार यांनी त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेले असून त्यांच्या स्वतःच्या जीवाला बरे वाईट करण्याचा मेसेज व्हाट्सअप ग्रुप वर टाकला व श्री पवार यांच्या जीविताला काय झाले तर सर्वस्वी डॉक्टर खलीपे हे जबाबदार राहतील असा मेसेज पवार यांचे कडून टाकण्यात आला . मधुकर पवार हे रात्री उशिर पर्यंत फोन बंद करून गायब आहेत . त्यांच्या जिवीताला काय धोका निर्माण झाल्यास डॉ . खलिपे हेच जबाबदार राहतील असा आरोप ही मधुकर पवार यांच्या घरच्यांनी केला आहे . निश्चितच सदरचा प्रकार अतिशय गंभीर स्वरूपाचा असून डॉक्टर महेश खलीपे यांचा मनमानी कारभार दिवसेंदिवस वाढत असून या सदर प्रकार बाबत डॉक्टर महेश खलीपे यांनी श्री मधुकर पवार यांची माफी न मागितल्यास कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने जिल्हा परिषद आवारात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा एका निवेदनामार्फत जिल्हाध्यक्ष अजित वाघमारे यांनी दिला