महाबळेश्वर हे देशातील महत्त्वाचे पर्यटन क्षेत्र असून महाबळेश्वर व परिसराच्या पर्यटन विकासासाठी अत्यंत नियोजनबद्ध आराखडा करून वाहतूक कोंडी सारखी समस्या कमी करण्याची गरज आहे तसेच व्यापाऱ्यांचे देखील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत महाबळेश्वरच्या पर्यटन विकासासाठी अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्या पाठीशी महाबळेश्वर वाशी यांनी उभे रहावे असे आवाहन सायली कोंढाळकर यांनी व्यक्त केले.
महाबळेश्वर शहरातील गणेश कॉलनी येथे झालेल्या कोपरा सभेत त्या बोलत होत्या. यावेळी वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभेचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव, सौ. निशा जाधव यांच्यासह महाबळेश्वर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सायली कोंढाळकर म्हणाल्या, महाबळेश्वर शहराला निसर्गाने भरभरून वरदान दिली आहे मात्र पर्यटनाच्या दृष्टीने आजही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पर्यटन वाढीसाठी दूरदृष्टी असलेले नेतृत्व आपण सर्वांनी विधानसभेत सन्मानाने पाठवायला हवे यासाठी महाबळेश्वर शहर व परिसरातील महिला नागरिक व व्यापाऱ्यांनी पुरुषोत्तम जाधव यांच्यासारख्या कर्तृत्ववान व अभ्यासू व्यक्तीला आमदार म्हणून विधानसभेत मोठ्या मताधिक्याने पाठवावे.
महाबळेश्वर शहरात महिलांचा घरोघरी जाऊन प्रचार
वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्या प्रचारासाठी महाबळेश्वर शहरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली असून सध्या महाबळेश्वर शहरात घरोघरी प्रचार सुरू केला आहे.