पुरुषोत्तम जाधव यांचे तापोळा ,कुट्रोशी येथील प्रचार रॅलीत आवाहन
महाबळेश्वर/ प्रतिनिधी
गेली ५० वर्षे हून अधिक काळ सर्वच सत्ता घरात उपभोगणाऱ्या आणि सत्तेचे केंद्रीकरण घरातच करणाऱ्या प्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठीच मी अपक्ष म्हणून मैदानात उतरलो आहे. ज्या नेत्याला कार्यकर्त्यांची किंमत नाही भर सभेत निष्ठावंत व ज्येष्ठ कार्यकर्त्यांना अपमानित करण्याची संस्कृती ज्यांच्यात आहे. अशांना आता वेळीच रोखण्याची गरज आहे. अन्यथा येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही. स्वतःला जननायक म्हणून घेणाऱ काय? असा खणखणीत सवाल पुरुषोत्तम जाधव यांनी तापोळा येथील प्रचार रॅली दरम्यान केला.
वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्या प्रचारार्थ महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी, महाबळेश्वर, तापोळा या परिसरातील गावात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी ते बोलत होते.दरम्यान यावेळी भिलार टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
पुढे पुरुषोत्तम जाधव म्हणाले, ज्यांना संस्कृती काय आहे ?याची जाण नाही अशांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देत आहात मात्र मतदार संघाचे कुठलेही प्रश्न या महाशयाने विधानसभेत मतदार संघाचा एक ही प्रश्न मांडला नाही मात्र दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्यात हा गडी खूप पटाईत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष पुढाकाराने महाबळेश्वर परिसरातील विशेषता तापोळा भागात कायापालट झाला आहे. मी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारा कट्टर कार्यकर्ता आहे, मात्र या मतदारसंघात शिवसैनिकांच्या वर नेहमीच अन्याय करण्याचे काम अजित पवार गटाने केले आहे. ज्यांच्या विरोधात आपण गेली २५ वर्षे संघर्ष करतोय त्यांच्याबरोबर काम करणे शक्य नाही . माझ्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना त्रास नको व महायुतीत वितृष्ठ नको म्हणून मी रीतसर वर्षा निवासस्थानावर जाऊन वर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना राजीनामा दिला. व त्या क्षणापासून कामाला लागलो. मात्र शिंदे साहेबांची मला नेहमीच साथ असते. व साथ राहणार आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात अपक्षांची भूमिका निर्णायक राहणार असून या अपक्ष आमदारांमध्ये मी स्वतः नक्कीच असणार आहे.२३ तारखेचा निकालातून संपूर्ण महाराष्ट्राला हे पाहायला मिळेल.
वाई ,खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात यावेळी मोठे परिवर्तन झालेले असेल या परिवर्तनात तापोळा , कांदाटी परिसरात तील मतदारांचा सिंहाचा वाटा असेल. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
चौकट…..
तापोळा खोऱ्यातील दऱ्याखोऱ्यात किटलीचा दणदणाट…
महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा ,कांदाटी खोऱ्यात पुरुषोत्तम जाधव यांचा झंजावाती दौरा पाहायला मिळाला. या दौऱ्यात
वाईच्या आमदाराच्या कारभाराला जनता आता विटली… आता निवडून आणायची आता फक्त पुरुषोत्तम जाधव साहेबांची किटली… हा नारा गावोगावी ऐकायला मिळाला. महाबळेश्वर परिसरातील सर्वच गावात पुरुषोत्तम जाधव यांचे नागरिक महिलांनी जोरदार स्वागत केले.