फलटण प्रतिनीधी :- दिनांक ७ रोजी फलटण तालुक्यातील सोशल मीडियावर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने दोन ते तीन ठिकाणी कारवाई केल्याची माहिती वायरल होत याबाबत निवडणुक निरीक्षक अथवा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून कोणत्याही प्रकारची माहिती न मिळालेली तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू होती.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक ७ रोजी सकाळी सोशल मीडियावर काही व्हिडिओ व पोस्ट ठराविक अंतराने व्हायरल झाले यामध्ये फलटण तालुक्यात दोन ते तीन ठिकाणी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने त्यांच्याकडे आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई केल्याची माहिती देण्यात आली होती. सदर एक ठिकाणी काही न सापडल्याचे माहिती मिळत असून दोन ठिकाणी किराणा सामानाचे वाटप करण्यासाठी तयार केलेले किट भरारी पथकास सापडली असल्याची माहिती मिळत असून दोन ठिकाणी आढळून आलेल्या किराणा किटच्या बॅगवर कोणत्याही पक्षाचे स्टिकर आढळून आले किंवा नाहीत याबाबत माहिती मिळू शकली नाही तसेच कोणत्या ठिकाणी कोणत्या व्यक्तीकडून अथवा राजकीय पक्षाकडून ही किट आढळून आली याबाबत निवडणुक निरीक्षक अथवा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून कोणत्याही प्रकारची माहिती न मिळालेली तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू होती.
रात्री उशिरापर्यंत याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती विचारली असता त्यांच्याकडून भरारी पथकाने केलेल्या कारवाईबाबत कोणत्याही प्रकारचे अधिकृत माहिती दिली गेली नसल्याने झालेल्या कारवाई बाबत सविस्तर व अधिकृत माहिती मिळाली नाही. राजकीय पक्षाच्या दबावामुळे सदर प्रकरणी माहिती देण्याचे टाळण्यात आल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात होत होती. येणाऱ्या काळात निवडणुक निरीक्षक अथवा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून माहिती दिली जाणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे