लोणंद,
लोणंद शहराची सध्यस्थितीतील पाणी पुरवठा योजना हि ग्रामपंचायत कालीन सन १९६४ ची आहे. त्यानंतर शहराचे झालेले औद्योगिकीकरण तसेच लोणंद हे शहर मध्यवर्ती असल्याने बाजारपेठेतील वाढता प्रतिसादामुळे शहराची वाढलेली लोकसंख्या तसेच प्रत्येक वर्षी येणारा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा, वाढते नागरीकरण, दळण वळण यामुळे लोणंद शहरास निकषाप्रमाणे मानसी १३५ लिटर्सप्रमाणे सुरळीत पाणी पुरवठा होण्याच्या दृष्ठीने नवीन पाणीपुरवठा योजनेची आवश्यकता होती.
लोणंद नगरपंचायत परिसरातील सर्व नागरिकांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे कि, मा. जननायक आमदार मकरंद (आबा) पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून शासनाच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजने अंतर्गत भविष्यातील लोणंद शहराची सन २०५५ पर्यंतची वस्तुस्थिती विचारात घेवून रक्कम रु ६२.४३ कोटीची “लोणंद नगरपंचायत पाणी पुरवठा योजना” मंजूर झाली आहे. सदरची योजना हि “वीर” धरणावरून प्रस्तावित आहे.
वीर धरण येथे इनटेक चेंबर व जॅकवेल ची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच लोणंद नगरपंचायत हद्दीतील MIDC शेजारील शासकीय जागेत 8.50 MLD क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. सदर जलशुद्धीकरण केंद्र तसेच वीर धरण येथील पंपिंग स्टेशन हे पूर्णपणे सोलर उर्जेवर व अॅटोमेशन तत्वावर आधारित आहे त्यासाठी प्रकल्पात विशेष तरदूत करण्यात आली आहे.
सदर योजने अंतर्गत जलशुद्धीकरण केंद्र येथे नवीन १२.७४ लक्ष लिटर्स क्षमतेचा MBR , सेंट अॅन्स स्कूल येथे २.९७ लक्ष लिटर्स क्षमतेचा नवीन ESR उभारण्यात येणार आहे. तसेच इंदिरानगर व गोटेमाळ येथील अस्तित्वातील उंच पाण्याच्या टाक्या निष्कासित करून त्याठिकाणी अनुक्रमे ४.१६ लक्ष लिटर्स व ३.१८ लक्ष लिटर्स क्षमतेच्या उंच पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार आहे. तसेच गोटेमाळ येथे ०.७२ लक्ष लिटर्स क्षमतेचे १, sump उभारण्यात येणार असून त्यातील पाणी pump करून सेंट अॅन्स स्कूल येथील २.९७ लक्ष लिटर्स क्षमतेचा नवीन ESR मध्ये सोडण्यात येणार आहे. तसेच सदर योजनेमध्ये गणपती मंदिरापाठीमागील उंच पाण्याच्या टाकीचा (७.५० लक्ष लिटर्स क्षमता) समावेश करण्यात आला आहे.
वीर धरण येथील इनटेक चेंबर व जॅकवेल द्वारे अशुद्ध पाणी पंप करून १५.७७ कि.मी. अंतराची DI राईझिंग मेन पाईप द्वारे लोणंद नगरपंचायत हद्दीतील MIDC शेजारील शासकीय जागेतील जलशुद्धीकरण केंद्र येथे येणार आहे. सदर ठिकाणी अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध पाणीजलशुद्धीकरण केंद्र येथील नवीन १२.७४ लक्ष लिटर्स क्षमतेचा MBR येथे साठवण करून या टाकी द्वारे नैसर्गिक रित्या सदरचे पाणी हे इंदिरानगर, गोटेमाळ, गोटेमाळ sump व गणपती मंदिरापाठीमागील पाण्याच्या टाकीत सोडण्यात येणार आहेत. तसेच गोटेमाळ येथील sump मधून पाणी पंप करून ते सेंट अॅन्स स्कूल येथील नवीन ESR मध्ये सोडण्यात येणार आहे. आणि सदर सर्व टाकीद्वारे संपूर्ण शहरास HDPE मेन पाईप द्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
लोणंद नगरपंचायत पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ, मा. ना. श्री. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व मा. ना. श्री. शंभूराज देसाईमंत्री, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य तथापालकमंत्री सातारा व ठाणे जिल्हा यांचे शुभहस्ते, मा.खा.श्री.सुनिल तटकरे सदस्य, रायगड लोकसभा मतदार संघ यांचे अध्यक्षतेखाली आणि मा. खा. श्री. नितीन जाधव- पाटील सदस्य, राज्यसभा, मा. खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सदस्य, लोकसभा, मा. आ. श्री. रामराजे नाईक-निंबाळकर सदस्य, विधान परिषद , मा. आ. श्री. मकरंद जाधव-पाटील सदस्य, विधानसभा, वाई-खंडाळा-महाबळेश्वर, मा. श्री. जितेंद्र डूडी, (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, सातारा, सौ. सीमा वैभव खरात नगराध्यक्ष, श्री. रविंद्र रमेश क्षीरसागर उपनगराध्यक्ष, श्री. भरत शंकरराव शेळके, सभापती, बांधकाम, नियोजन व विकास समिती, सौ. रशिदा शब्बीरभाई इनामदार, सभापती, पाणीपुरवठा व जलनिःसारण समिती, नगरसेवक श्री. शिवाजीराव शंकरराव शेळके पाटील, सौ. मधुमती सागर गालिंदे, श्री. सचिन नानाजी शेळके, सौ. सुप्रिया गणेश शेळके, श्री. भरत जयवंत बोडरे, श्री. गणी जुसुफ कच्छी, सौ. दिपाली संदीप शेळके, सौ. आसिया साजिद बागवान, सौ. दिपाली निलेश शेळके, सौ. राजश्री रविंद्र शेळके, सौ. ज्योती दिपक डोनीकर, सौ. तृप्ती राहुल घाडगे, श्री. प्रविण बबन व्हावळ श्री. सागर बाबुराव शेळके, श्री. आनंदराव शंकरराव शेळके पाटील व मा. श्री. दत्तात्रय महादेव गायकवाड, मुख्याधिकारी, श्री. सागर परशुराम मोटे, नगर अभियंता, तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद, लोणंद नगरपंचायत लोणंद यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दि.०७ ऑक्टोबर, २०२४ रोजी सकाळी १०.०० वा. मौजे लोणंद, ता. खंडाळा जि. सातारा येथे संपन्न होणार आहे.