कोट्यावधी च्या बाता मारणार्या प्रस्थापितांनी तालुका भकास केला आहे. निधी मंजूर करुन आणणे आणि तो टक्केवारी वरती वाटून टाकणे परंतु विकासच्या नावाने बोंबाबोंब चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे. विकास दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी स्थिती तालुक्यात आहे. निकृष्ट काम आणि टक्केवारी ला आता लोक कंटाळली आहे. तालुक्यात गावागावात विकासाचे बोर्ड लावून विकासाचे प्रदर्शन करण्याची वेळ का आली? अस मत पाटण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भानुप्रताप उर्फ हर्षद कदम यांनी केले.
ढेबेवाडी विभागातील गावभेट दौऱ्यात ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा प्रमुख रविंद्र पाटील, तालुकाप्रमुख सुरेश पाटील, सचिन आचरे, संजय संकपाळ, रामचंद्र पवार आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
हर्षद कदम म्हणाले, पाटण विधानसभा मतदारसंघात प्रस्थापित मंत्र्यांचे कार्य म्हणजे विकास नसून, भकास असे असेच आहे. दोन हजार कोटींच्या वल्गना करणारे विरोधक आज मतांसाठी हतबल झाले आहेत. मताचा जोगवा मागताना त्यांच्या चेहऱ्यावर पराभवाची छाया स्पष्टपणे दिसून येत आहे. यावेळी जनतेने स्वार्थी प्रवृत्तीच्या व्यक्तींना पराभूत करावयाचा निश्चय केलापाटण तालुक्यातील जनता विरोधकांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. जनतेचा बुद्धी भेद करुन सत्तेचा वापर करत सर्वसामान्य लोकांना झुलवत ठेवण्याचे काम प्रस्थापितांनी केले.
विकासाच्या नावाखाली बिल्डर यंत्रणा राबवून तालुक्याचा खेळखंडोबा केला. तालुक्यातील तरूणांना नोकरीच्या शोधात बाहेर जावे लागत आहे. नागरिकांच्या पोटापाण्यासाठी कोणतेही ठोस पावले उचलली गेली नाहीत. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न जैसे थे आहे. एकाचा कारखाना ऊसाला दर देत नाही, तर दुसऱ्याचा कारखाना दहा वर्षापासून सुरू होतोय. पर्यटन, औद्योगिक प्रकल्पाच्या नावाखाली लोकांना झुलवत ठेवण्याचे काम कित्येक वर्षापासून सुरू आहे. हे आताआत लोकांच्या बारकाईने लक्षात आले आहे. त्यामुळे पाटण विधानसभा मतदार संघातील जनतेने स्वार्थी प्रवृत्तीच्या व्यक्तींना पराभूत करावयाचा निश्चय केला आहे. सर्वसामान्य परिवारातील कार्यकर्ता म्हणून मला जनता निवडून देईल, असा मला विश्वास आहे. विरोधकांनी अवैध मार्गाने मिळविलेली धनशक्ती विरुद्ध निष्ठावंत शिवसैनिकांचा आवाज, अशीच लढाई होणार असून, महाविकास आघाडीने भूगर्भात ‘निष्ठावंत’ नावाचा सुरुंग पेरला आहे. त्याचा विस्फोट २३ तारखेला मतदानातून दिसेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला