कराड : Covid – 19 मुळे गेले अनेक दिवस शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यी ऑनलाईन शिक्षण घेत होते. परंतु गेल्या काही महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या तुलनेने कमी होत असल्यामुळे शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या कालावधीनंतर विद्यार्थी आता शाळांमध्ये नव्या पर्वाची सुरुवात करत आहे.
आपल्या शिक्षकांना मित्र-मैत्रिणींना व पवित्र वास्तूला भेटण्याचा त्यांचा हा पहिला दिवस निश्चितच आनंदाचा आहे. त्यांच्या या आनंदात आपणही सामील होण्यासाठी आपले नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांनी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन विद्यालय मध्ये स्वागत करावे स्वागत करावे अशा सूचना केल्या. त्यांच्या सूचनांचे पालन करून, सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव निखिल शिंदे यांनी राष्ट्रवादी युवक कांग्रेस प्रदेश सचिव. श्री.सिद्धिविनायक शिक्षण संस्था, उरुल येथील विद्यालयमध्ये जाऊन, शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षकांचे गुलाब पुष्प व पेन देऊन स्वागत केले.
त्यावेळी संस्थेचे संस्थापक निवासराव निकम, समीर कुडची, ऋषभ डुबल, अथर्व सूरज जाधव, दत्तात्रय निकम, शिवाजीराव जाधव, अथर्व साळुंखे मुख्याध्यापक सदाफुले मॅडम, व शिक्षक, कर्मचारी उपस्थीत होते.