महेश शिंदेंनी कोरेगावात रोखलं शशिकांत शिंदेंना
सातारा : कोरोगाव नगरपंचायतीत शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलनं बाजी मारली आहे. तर राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. शशिकांत शिंदे यांना पुन्हा एकदा धक्का बसला असून राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलला चार जागा मिळवता आल्या.
कोरेगाव नगरपंचायत – सर्व १७ जागांची मतमोजणी पूर्ण
१३ जागा कोरेगाव शहर विकास परिवर्तन पॅनेलला आणि चार जागा राष्ट्रवादी पॅनेलला मिळाल्या आहेत. कोरेगाव नगरपंचायतीत सत्तांतर झालं आहे. आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कोरेगाव शहर विकास परिवर्तन पॅनेलच्या ताब्यात सत्ता.
खंडाळा नगरपंचायतीत पहिल्या फेरीअखेर राष्ट्रवादीने चार तर भाजपने २ जागा जिंकल्या आहेत. प्रभाग दोन मध्ये केवळ दोन मतांनी राष्ट्रवादी विजयी. तर प्रभाग चार मध्ये केवळ तीन मतांनी भाजपा विजयी
लोणंद – नगरपंचायतीचे निकालही आले हाती
यामध्ये राष्ट्रवादीने सर्वाधिक ९ जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसनं ३, भाजपने ३ जागा मिळवल्या आहेत. अपक्ष उमेदवाराचा एका ठिकाणी विजय झाला असून सेनेला खातंही उघडता आलेलं नाही. एका जागेवरील चिठ्ठीचा निकाल बाकी आहे.



























