सांगली शहर पो.ठाणे येथून दि. ६/११/२०१७ रोजी रॅाबरी व अपहरणाचे गुन्ह्यातील आरोपी अमोल भंडारे व अनिकेत कोथळे पळून गेले म्हणून त्यांचेवर गुन्ह्य दाखल झाले नंतर त्याचा तपास करून सदर गुन्ह्यातील फिर्यादी युवराज बजरंग कामटे यांना आरोपी केले व दोषारोप पत्र दाखल केले.
सदर खटला हा अनिकेत कोथळे खून प्रकरणी निगडीत असल्याने दोन्ही खटले हे एकत्रित चालविण्याचे आदेश मे. जिल्हा न्यायालय सांगली यांनी केले असून सदर कामी दोषारोप पत्राचे वाचन दि.१८/११/२०२४ रोजी होणार आहे.
सदरकामी आरोपी क्र.१ युवराज कामटे व आ. क्र.६ राहुल शिंगटे यांना जामिनावर खुले करण्यात यावे असा अर्ज बचाव पक्षातर्फे ॲड विकास बा. पाटील-शिरगांवकर यांनी दि१६/११/२०२४ रोजी न्यायालयात सादर केला आहे.
सत्र खटला क्र. ३३/२०१८ मध्ये सरकार पक्षाचा पुरावा संपला असून बचाव पक्षातर्फे आरोपी युवराज बजरंग कामटे यांची साक्ष नोंदविली जात आहे.
दोन्ही खटले हे आता एकत्रित चालणार आहे त्यामुळे अनेक कायदेशीर मुद्दे आता समोर येणार आहेत.