दि.३१/५/२०२१ रोजी प्रभू मल्लापा उपार हा जवान त्याची सुट्टी संपलेनंतर रांची येथे हजर होण्यासाठी गोवा-निजामुद्दीन एक्सप्रेस ने बेळगांव या रेल्वे स्टेशन येथून प्रवासास सुरुवात केली. बोगी क्र-७ सीट क्र.२९ चे आरक्षण प्रभू मल्लापा उपार यांचे नावे होते. सीट क्र २५,२६,२७, २८ वरून छोटेलाल गुप्ता यांचे कुटुंब प्रवास करत होते. सदर बोगी मध्ये एकूण ७२ प्रवासी प्रवास करत होते. रात्री ९.०० जेवण झाल्यानंतर झोपण्यासाठी सदर सीट हे बर्थ म्हणून त्याची जोडणी केली व त्याप्रमाणे प्रवास सुरू झाला, कोराना संक्रमणाचा काळ असल्याने तोंडावर मास्क लावलेले होते. बर्थ क्र.२५,२६,२७,२८ वर गुप्ता कुटुंबीय झोपले, पिडात मुलगी ही सर्वात वरील बर्थ क्र.२७ वर झोपली होती व प्रभू मल्लापा उपार हा समोरच्या बाजूस मध्यभागी असणाऱ्या बर्थ क्र.२९ वर झोपला होता. पिडीत मुलीच्या बर्थ समोर बर्थ क्र.३० हा आहे व त्या वरून प्रभू मल्लापा उपार हा प्रवास करत नव्हता.
दि.१/६/२०२१ रोजी सकाळी ७.०० सदर बोगी मध्ये कोणाची मुलगी बेपत्ता झाली आहे का अशी विचारणा टी.सी.यांचेकडून करण्यात आली तेव्हा गुप्ता कुटुंबियांना त्यांची मुलगी ही बर्थ क्र.२७ वर दिसून आली नाही म्हणून ते बेलापूर (अहमदनगर) रेल्वे स्टेशन येथे उतरले व तेथून ते सातारा येथे परत जाण्यास निघाले व दि. ४.३० सिव्हील हॅास्पिटल सातारा येथे पोहोचले.
पिडीत मुलगी ही लोणंद येथील रेल्वे ट्रॅक चे बाजूस पडली होती व तिला सकाळी ७.०० चे दरम्यान लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रामध्चे तपासणी साठी आणले, तपासणी करणारे डॅाक्टर संबंधित रेल्वे पोलिसांनी पिडीत मुलीला प्रश्न विचारले असता तिने एका माणसाने तिला रेल्वे तून ढकलून दिले असे सांगितले पण त्या माणसाला ती ओळखू शकणार नाही असे स्पष्ट सांगत होती व त्याचे मोबाईल चित्रीकरण रेल्वे पोलीसांकडून करण्यात आले.
दि.१/६/२०२१ रोजी सकाळी १०.०० चे सुमारास पिडीत मुलगी ही सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाली व तिचेवर तपासणी करणारे डॅाकेटरांना सुध्दा तिने काही सांगितले नाही, दरम्यान दुपारी १.०० वा. लष्कर जवान प्रभू उपार यांस भुसावळ रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे पालीसांनी क्र. ७,बर्थ क्र. २९ वरून कोणतेही कारण न सांगता ताब्यात घेतले, सुमारे ३० प्रवाश्यांचे फोटो काढले व ते पोलिसांना मिरज पोलिसांना मोबाईल पाठविले,दुपारी ४.३० वा. मुलीचे आई वडील हे तिला भेटले तसेच महीला पो. उप.निरीक्षक सौ. रूपाली उबाळे व सामाजिक कार्यकर्त्या सुजाता देशमुख यांनी पिडीत मुलींचे बाबतीत तिचेवर बाथरूम मध्ये बलात्कार, विनयभंग अश्या प्रकारचा गुन्हा करून तिला जिवे ठार मारण्यासाठी रेल्वे तून बाहेर फेकले केला अशी कथा रचून तसे प्रश्न तयार केले,सदर मुलीला व तिचे आई वडिलांना ते फोटो दाखविले त्यानंतर प्रभू मल्लापा उपार हा असा गुन्हा करू शकतो असा संशय पकडून त्याला रेल्वे पोलीस ठाण्यात अडकवून ठेवले व दि २/६/२०२१ रोजी रात्री २.०० वा पोलिसांनी त्याला भुसावळ येथून ताब्यात घेऊन मिरज येंथे निघाले व सायंकाळी ५.०० वा त्याला मिरज रेल्वे पोलीसांचे ताब्यात दिले, दरम्यान सदर आरोपीस न्यायालयासमोर हजर करून ट्राझिंट वॅारंट घेतलेले नव्हते .
दि ३/६/२०२१ रोजी प्रभू मल्लापा उपार यांस सकाळी ११.३० वा मे . विशेष सत्र न्यायाधीश श्री. ए के पटणी यांचे समोर हजर केले असता प्रभू मल्लापा उपार हा मे. न्यायालया समोर हिंदी भाषेत सांगत होता की, मुझे मराठी नही समझ आता है,पुलीस मुझे कुछ बता नही रही है, और मुझे २४ घंटसे जे जादा मै ताबे हू । त्यावर म्. न्यायालयाने पोलिसांना काही प्रशन मराठीत विचारले व त्यानंतर पोलीस कोठडी मंजूर केली,तेंव्हा पासून सदर निरपराध इसम हा कारागृहात दि.७/६/२०२४ पर्यंत राहीला आहे.
सदरकामी सरकार पक्षाने सादर केलेला पुरावा हा कसा खोटा आहे हे बचाव पक्षाने सरकारी पक्षाचे साक्षीदारांचा उलटतपासातून जी उत्तरे समोर आणली त्यातून तो पुरावा तयार केलेला पुरावा आहे हो न्यायालयासमोर आणले. सदरकामीतील पिडीत मुलीने कबूल केले की आरोपीने तिचे सोबत लैंगिक अत्याचार केला आहे हे कोणालाही सांगितले नसून त्याने त्याची सूसू ची जागा माझे तोंडाजवळ आणली हे वाक्य संबंधित पोलीस सांगत आहे व ते वाक्य मी बोललेले नाही. सदर क्लिप मध्ये महिला पोलीस अधिकारी यांचे हातात जो कागद आहे त्यावरील प्रश्नोत्तरे ही लिहून आणलेली आहेत ओळख परेड घेण्यापुर्वी प्रभू मल्लापा उपार याचा फोटो दाखविला होता असे मान्य करते.
पिडीत मुलीची आईने बचाव पक्षाचे प्रश्न मान्य केले, वैद्यकीय अधिकारी यांनी सदर कागदपत्रामध्ये पिडीत मुलीवर आरोपीने लैंगिक बलात्कार केला आहे असे नमूद आहे मात्र तिची तपासणी केली असता तिचेवर लैंगिक बलात्कार झालेला नाही तसेच कागदपत्रांमध्ये खाडाखोड केली हे मान्य करतात, रासायनिक प्रयोग शाळेचे तज्ञ सांगतात की, मुलीच्या कपड्यावर जे वीर्याचे डाग दिसतात पण पंचनान्यात तसे नमूद नाही, तसेच आरोपीचे वीर्य तपासणी साठी पाठविले नव्हते, तसेच कपड्यावर जे वीर्य आहे त्यांची तपासणी करावी असे तपासणी अधिकारी यांचे पत्र नाही, हे कबूल करतात.
तपासी अधिकारी हे मान्य करतात की बर्थ क्र. ३० वर जो माणूस बसला होता त्याचा तपास केला नाही,व बर्थ कार. २९ वर बसलेल्या जवानास अटक केली तसेच सदर आरोपी हा ४२ तास पोलीसांचे ताब्यात होता व त्या न्यायालयात हजर केलेले नाही, बचाव पक्षाचे वकील ॲड.विकास बा. पाटील- शिरगांवकर यांनी पिंडांचा मुलगी, तिची आई ,सरका पक्षाचे २१ साक्षीदार, पंच, वैद्यकीय अधिकारी, तहसिलदार, रासायनिक तज्ञ, तपासी अधिकारी यांचा घेतलेला उलट तपास व दिलेली उत्तरे ही,भारतीय लष्कर दलातील जवानांचा ताबा,अटक बेकायदेशीर ठरविते व सदरचा तपास कसा चुकीचा व खोटा पुरावा तयार करणारा आहे हे समोर आणणारी असून, जवान प्रभू उपारचे निरपाराधत्व सिध्द करणारी ठरली. सदर गुन्ह्याचा तपास रेल्व पोलीस खात्याचे,डीसीपी वाय.से. पाटील,पो. निरीक्षक बावीस्कर,महिला पो. निरीक्षक श्रीमती मंजीरी कुलकर्णी, सौ.रूपाली उबाळे यांनी सदर गुन्ह्याचा तपास केला व भारतीय लष्कराचे जवान हा निरपराध आहे हे दिसत असताना,नाहक आरोपी करून त्यांचा गाजावाजा केला व त्याला शिक्षा व्हावी असा तपास व पुरावा तयार केला,सदरचा प्रकार हा फौजदारी गुन्ह्यांत येणारा व गंभीर आहे.भारतीय लष्काराचा एक निरपराध जवान हा गेली ४ वर्षे कारागृगातून दोषारोप पत्रास सामोरे गेला,दरम्यान त्याचे वडील मयत झाले,त्याच्या पत्नीने सदरचा गुन्हा खरा असा गैर समज करून घेऊन घटस्फोटाचा अर्ज दाखल केला व या सर्व गोष्टी त्या काळात घडत गेल्या.
सदरकामी बचाव पक्षाचे वकील ॲड.विकास बा.पाटील- शिरगांवकर यांनी केलेली तोंडी व लेखी युक्तिवाद ऐकून प्रभू मल्लापा उपार यांस मे. विशेष सत्र न्यायाधीश,श्रीमती के.व्ही. बोरा साो यांनी विशेष सत्र खटला क्र. १३३/२०२१ मधून निर्दोष मुक्त केले.
सदर निकालाकडे भारतीय लष्कर दलाचे विशेष लक्ष लागलेले होते व सदरचा निकाल हा देशाच्या न्याय- व्यवस्थेवर विश्वास दृढ करणारा आहे असे मत व्यक्त केले जात आहे.
सदर निकालाचे सविस्तर वाचन व अवलोकन करून सेना दलाची व व्यक्तिगत स्वरूपात झालेली बदनामी यांची,बेकायदेशीर अटक या बाबतची नुकसान भरपाई, रेल्वे पोलीस खात्या कडे करणार व तपास कसा नसावा याचे हे ज्वलंत उदाहरण असे परखड मत ॲड.विकास बा.पाटील-शिरगांवकर यांनी व्यक्त केले.