महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :फलटण
रेल्वेच्या पुणे मंडळाने प्लॅटफार्म तिकीटाची (Platform Ticket) की कीमत वाढवून ५० रुपये केली आहे.
यानंतर सोशल मीडियावर हे प्लॅटफॉर्म तिकीट व्हायरल झाले आणि वादाला तोंड फुटलं. एवढचं नव्हे तर त्यावरून राजकारणही सुरू झालं. अखेर यावर रेल्वेने स्पष्टीकरण दिलं. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. यानुसार प्लॅटफॉर्म तिकीटाची किंमत ५० रुपये करण्यात आली आहे, असे रेल्वेच्या प्रवक्त्याने स्पष्टीकरण दिले आहे..