फलटण : दि.५ नोव्हेंबर २०२१ रोजी दरवर्षीप्रमाणे साखरवाडी क्रीडा मंडळाचे खो-खो खेळाडू राष्ट्रीय राज्यस्तरीय पुरस्कार विजेते दरवर्षीप्रमाणे एकत्र जमतात दीपोत्सव साजरा केला जातो.
या ठिकाणी साखरवाडी क्रीडा मंडळाचे वतीने सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रियांका भोसले कृषी अधिकारी, राष्ट्रीय खेळाडू कुमार निकेतन निंबाळकर, पीएसआय, सुनील माने, एक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या साखरवाडी क्रीडा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. साखरवाडी क्रीडा मंडळाचे खेळाडू निलेश भोसले ,विक्रम जगताप, विवेक भोसले, सुधीर बोर्डे ,अमोल बोडरे ,अमर बोडरे ,रिस्क ऋषिकेश बोडरे, धुमाळ साहेब ,धीरज जगताप, छोटी खेळाडू यांनी कार्यक्रम पार चांगल्या पद्धतीने पार पाडला. साखरवाडी क्रीडा मंडळाचे खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार विजेते, राणी लक्ष्मीबाई पुरस्कार विजेते, वीर वाला जानकी जवळजवळ तीनशे खेळाडू उपस्थित होते. व साखरवाडी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. जगदाळे, साखरवाडी शिक्षण संस्थेचे संचालक राजेंद्र शेवाळे, साखर विद्यालयाचे शिक्षक सुनील भोसले, कांबळे , कुंभार, विलास ननावरे, सुमित धायगुडे, व पालक वर्ग उपस्थित होता उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन साखरवाडी क्रीडा मंडळाचे संजय बोडरे व साखरवाडी विद्यालय यांच्यावतीने करण्यात आले.