महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :अमोल राजपूत (वालचंदनगर)
वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हेगारी प्रमाण कमी करून जनतेशी संवाद साधून लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात आले आहेत. चोवीस तास सेवा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना ठाणे इमारत नाही. हक्काची जागा नाही. अशा परिस्थितीमध्ये अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे मत वालचंदनगर येथील स्वामी समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष रमेश देशपांडे यांनी व्यक्त केले.
वालचंदनगर पोलीस ठाण्याला (आय एस ओ ए प्लस) ISO A+ मानांकन मिळाल्याबद्दल स्वामी समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष रमेश देशपांडे, सचिव अमोल रजपूत राष्ट्रवादी काँग्रेसचे वालचंदनगर शहराध्यक्ष अमरसिंह निंबाळकर यांच्या हस्ते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांचा सत्कार करण्यात आला.
पुणे ग्रामिणचे पोलीस अधिक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षापासुन पोलीस ठाण्यामध्ये पोलीस व नागरिक यांचेमध्ये सुसंवाद रहावा, पोलीस स्टेशनला येणा-या महिला तक्रारदार यांनी अडीअडचणी मांडण्यासाठी सुसंवाद रहावा म्हणुन पोलीस स्टेशन भरोसा सेल स्थापन करण्यात आलेला होता.
पोलीस स्टेशन ला येणा-या नागरिकांना व तक्रारदार यांचेसाठी पोलीस स्टेशन ला अभ्यागत कक्ष स्थापन करण्यात आलेला असुन नागरिकांना त्यांचे पोलीस स्टेशनचे सर्व कामकाज हे आँनलाईन ( सीसीटीएनएस ) यंत्रनेव्दारे) चालुन पोलीस स्टेशन चे सर्व क्राईम कक्ष , मुद्देमाल कक्ष, गोपणीय कक्ष यांचे रेकाँर्ड संगणिकृत केलेले आहे.त्याचप्रमाणे वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पाणीशुद्धीकरण प्रकल्प व्यवस्था केलेली आहे.
परिसरातील शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या तक्रारीचे निवारण होण्यासाठी प्रत्येक शाळा व काँलेजसाठी पोलीस काका व पोलीस दिदी ही संकल्पना राबविण्यात आलेली आहे. त्यामध्ये पुरुष पोलीस कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी यांनी दररोज शाळेला भेट देत आहेत. त्यामुळे काँलेज मध्ये घडणा-या छेडछाड प्रकरणाला आळा बसलेला आहे वरील लोकाभिमुख उपक्रम वालचंदनगर पोलीस स्टेशनला राबवुन भाडेतत्त्वावर असणा-या पोलीस स्टेशनच्या खोल्याचे आधुनिकीकरण करुन नागरिकांना जास्तीत जास्त सोई सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे वालचंदनगर पोलीस स्टेशन I.S.O. ( A+ ) मानाकंन मिळुन वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व त्यांच्या सहकाऱ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते प्रमाणपत्र देवुन सन्मानित करण्यात आले आहे.