महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कोरेगाव
सातारा पंढरपूर रोड, वरील संगम माहुली येथे रस्त्याचे काम चालू आहे.त्या कामामध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडा पडला आहे. त्या मुळे वाहनांना जाताना खूप मोठी कसरत करावी लागत आहे. काही वाहने (लहान वाहने )अडकत आहेत व नुकसान होत आहे. तसेच ऊस ट्रॅकटर व ट्रक यांना मोट्या खड्यातुन पुढे जाता येत नाही त्यातच ट्रॅक्टर ट्रॉली ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू असते.वाहनाच्या रांगा लागून ट्रॅफिक जाम होत असून नागरिकांचा वेळ वाया जात असून या रस्त्याच्या कामाची प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.