महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर)
इंदापूर तालुक्याचे मार्गदर्शक आधारस्तंभ , सर्वसामान्य जनतेचे लोकप्रिय नेतृत्व , राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दत्तात्रय भरणे ( मामा ) यांची महाराष्ट्र मत्स्यउद्योग विकास महामंडळ उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मत्स्यउद्योग विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवडीने इंदापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे . त्यांच्या निवडीचे इंदापूर सह सोलापूर वासियांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .






















