पाटण विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी पक्ष कार्यकारिणीची निवडी जाहीर
पाटण प्रतिनिधी: पाटण विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी व मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी पाटण विधानसभा मतदारसंघाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकारिणीची निवड माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सातारा जिल्हा मध्य. सह. बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. ही नवीन पक्ष कार्यकारिणी पक्ष संघटना वाढीसाठी व मोठ्या प्रमाणात युवा वर्गाला पक्षात सामील करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहील असा विश्वास सत्यजितसिंह पाटणकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
काही दिवसांपूर्वी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण पक्ष कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती. त्यामुळे नवीन पक्ष कार्यकारिणी निवड होऊन कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्याचबरोबर संघटना वाढीसाठी व येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी ही निवड महत्त्वाची मानली जात होती. नेत्यांकडून यावेळी अनुभवी कार्यकर्त्यांबरोबर युवकांनाही संधी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात होती. या सर्व बाबींचा विचार करून ही निवड पार पडली. राज्यस्तरीय कार्यकारणीवर सत्यजितसिंह पाटणकर, पाटण विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदी राजाभाऊ शेलार यांची ढेबेवाडी/कुंभारगाव विभाग उपाध्यक्षपदी राजेंद्र देसाई, तारळे विभाग उपाध्यक्ष पदी सदाभाऊ जाधव, नाटोशी विभाग उपाध्यक्ष पदी रंगराव जाधव,तांबवे/सुपने विभाग उपाध्यक्ष पदी निवासराव शिंदे, विधानसभा मतदारसंघ समन्वयक पदी राजेश पवार, सरचिटणीस पदी साहेबराव गायकवाड, सचिव सुभाषराव चव्हाण, सहसचिव झुंजारराव पाटील, खजिनदार पदी विलास शेडगे, निमंत्रक विजयसिंह वाघ, जिल्हास्तरीय कार्यकारिणीवर उपाध्यक्ष पदी रमेश मोरे, सरचिटणीस पदी सुभाषराव पवार यांची निवड करण्यात आली. यावेळी बोलताना मतदारसंघाचे नेते सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, पाटण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भक्कम करण्यासाठी व आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी पक्ष संघटनेची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. या नवोदित पदाधिकाऱ्यांनी पक्ष वाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याबरोबरच युवा वर्गाला पक्षात सामील करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जुन्या-नव्या कार्यकर्त्यांची सांगड घालून सर्वांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा.शरद पवार साहेब व माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे विचार मतदारसंघात रुजविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहायचं आहे. त्याचबरोबर पक्षात गैरवर्तन करणाऱ्या व अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही याची आत्ताच सर्वांनी नोंद घ्या असा दमही त्यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना भरला आणि लवकरच राहिलेल्या सर्व कार्यकरण्या पूर्ण करण्यात येणार आहेत. नवोदित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर , पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, उपसभापती प्रतापराव देसाई, जि. प.माजी सभापती राजेश पवार, पाटण अर्बन बँकचे चेअरमन बाळासाहेब राजेमहाडिक, तालुका दूध संघ चेअरमन सुभाषराव पवार , कोयना शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, सचिव अमरसिंह पाटणकर ,खरेदी-विक्री संघ चेअरमन अॅड.अविनाश जानुगडे ,बाजार समिती सभापती रेखाताई पाटील, आदी मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते , हितचिंतकांनी अभिनंदन केले .