कराड :कराड शहरातील २०२० ते २०२१ पर्यंतचे कराड शहरातील नागरिकांचे घरफाळे व पाणीपट्टी सरसकट माफ करण्याबाबत. कराड तहसीलदार व कराड शहर मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले कराड शहरातील शेतकरी, व्यापारी, रोजगारी, मध्यमवर्गीय नागरीक यांचे करोना काळात शासनाच्या नियम व अटीचे पालन करत व करोनाचा चढता व उतरता प्रादुर्भाव लक्षात घेता, नियमावलीप्रमाणे कोणताही व्यवसाय २०२० ते २०२१ या कालावधीमध्ये सुरळीत चाललेला दिसून येत नाही. त्यामुळे व्यवसायाची प्रगती व स्थिरता यामध्ये सर्व कराडकर संभ्रमीत होवून पूर्णपणे मेटाकुटीला आलेले दिसून येत आहेत.घरफाळा व पाणीपट्टी माफ का करावी .यामध्ये मोलमजुरी करुन भाडेतत्वावर रहाणारे नागरीक त्यांचे भाडे घरमालकास भाडे देणे अशक्य होवून बसले आहे. कारण त्यांचा उदरनिर्वाह करणाऱ्या किरकोळ स्टॉल स्वरुपी व्यवसाय, धुणी-भांडी करणाऱ्या महिला यांची कामे पूर्णपणे बंद पडली आहेत. मग त्यांनी घरमालकास भाडे कुठून भरायचे? व घर मालकांनी घरफळा व पाणीपट्टी नगरपालिकेस कोठून भरायची. व्यापाऱ्यांचे व्यवसाय पूर्णपणे ठप्प असलेने गाळा मालक किंवा भाडेतत्वावर गाळा वापरणाऱ्यांनी गाळे मालकांस भाडे कसे द्यायचे? तसेच गाळा मालक व व्यापारी यांनी बँकेचे हप्ते भरायचे का? नगरपालिकेची पाणीपट्टी व घरफाळा भरायचा.तसेच प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करणाऱ्या सर्व कंपण्यांमध्ये बऱ्यापैकी तरुण मंडळीही कंपण्या बंद पडण्याच्या मार्गी असलेने व काही कपण्या पूर्णपणे बंद असलेने सर्व तरुण घरी बसून आहेत. त्यामुळे त्यांनी नगरपालिकेचा घरफाळा व पाणीपट्टी कोठून भरायची.तसेच काही कुटुंबावर तर कोरोनाच्या आजारपणामुळे कुटुंबातील कर्ता पुरुषच मृत्यू पावलेने कुटुंबाचे कुटूंबच ठप्प झाले आहेत, त्यांनी घरफाळा व पाणीपट्टी कशी भरायची.तसेच काहीना नोकऱ्या आहेत शासकीय अथवा निमशासकीय अथवा प्रायव्हेट पण त्यांचे पगारच झाले नाहीत. अशा नागरिकांनी नगरपालिकेची पाणीपट्टी व घरफळा कसा भरायचा. जर शासन अशा महामारीचे कालावधीमध्ये नागरिकांना पाणीपट्टी व घरफाळा माफ करु शकत नसेल तर अशा प्रशासकीय यंत्रणेचा उपयोग काय? जर सातारकरांची एक वर्षाकरीता पाणीपट्टी व घरफाळा माफ होवू शकतो तर कराडकरांचा का नाही.याचे उत्तर शासनाने दयावे.तरी माझी प्रस्तुत निवेदनाद्वारे मा.जिल्हाअधिकारी व कराड तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा यांना नम्रपणे व कळकळीची विनंती आहे की, तुम्ही नागरिकांकरीता ,कोरोना काळामध्ये घालून दिलेले नियम व अटींचे सर्व नागरिक काटेकोरपणे पालन करतात, तसेच आपणही वर नमुद बाबींचा बारकाईने विचार करावा.