समशेरसिंह हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीमध्ये यात्रेस प्रारंभ ..
फलटण येथील दक्षिण काशी असलेल्या घोड्याची यात्रा गुरुवार दिनांक 21 रोजी मोठ्या उत्साहात व अलोट भक्तांच्या गर्दीमध्ये संपन्न झाली.
आबासाहेब मंदिर, या मंदिरामध्ये आरतीच्या वेळी भाविकांची अलोट गर्दी मध्ये पार पडली .
या यात्रे साठी फलटण नगर परिषद मा. विरोधी पक्षनेते समशेरसिंह हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांच्या उपस्थित मध्ये पालखी प्रस्थान झाली व छबिन्यास सुरूवात करण्यात आली यावेळी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष प. म. पु.श्यामसुंदर शास्त्री , प.पु.सुदामबुवा महाराज ,विश्वस्त श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्ट बाळासाहेब ननावरे , फरांद्वाडी गावचे सरपंच बंडू शिंदे , माजी पंचायत समिती उपसभापती विवेक शिंदे, रमेश मठपती,राजाभाऊ देशमाने ,निलेश चिंचकर, राहुल शहा, नितीन वाघ, अनिकेत पवार, कुमार जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.