बिदाल प्रतिनिधी दि २७ : धनगर ऐक्य अभियानाचे डॉ. शशिकांत तरंगे यांचे तर्फे करण्यात आला तसेच सामाजिक चळवळीत काम करणारे व समाजाची सत्य परिस्थिती सर्वांसमोर मांडणारे सुनिल वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली माण धनगर समाज यांच्या वतीने डॉ तरंगे यांचा सत्कार करून स्वागत करण्यात आले. यावेळी निवेदन कर्ते सचिन वाघमोडे यांचा सत्कार डॉ. शशिकांत तरंगे साहेब यांनी केला
त्यावेळी महेश सुळे,श्रीधर खताळ,उमेश वाघमोडे, रधूनाथ भिसे उपस्थित होते त्यावेळी डॉ. शशिकांत तंरगे यांनी समाजासाठी आपली दिशा स्पष्ट करताना अनेक मुद्दे मांडले. सध्या समाजाला एकाच व्यासपिठावर आणने गरजेचे असलेचे मत मांडले. शैक्षणिक बाबीवर लक्ष केंद्रीत करणेसाठी एक व्यापक आंदोलनाची गरज असलेले सांगितले भविष्यातही अशीच समाजातील प्रश्नावर व्यापक आंदोलन हातात घेणार असल्याचे सांगितले.
यावेळी माण तालुक्यातील सर्व समाज बांधव उपस्थित होते. दौऱ्यावर जात असताना म्हसवड येथे समाजातील बांधवाना भेटून सवांद साधला त्यावेळी डॉ. प्रमोद गावडे, शुभांगी वीरकर यांचा सत्कार करून सामाजिक विषयवार चर्चा केली.






















