फलटण : मुंजवडी ता. फलटण येथील महंमद बाबासो शेख यांची मुलगी हरवल्याची फिर्याद बरड पोलीस दूरक्षेत्रात दिली आहे.
मुंजवडी ता. फलटण येथील शानू महमंद शेख, वय २१ ही गुरूवारी रात्री घरात कोणास काही न सांगता निघून गेली असल्याची तक्रार तिचे वडील महंमद बाबासो शेख यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत बरड पोलीस दूरक्षेत्रात दिली आहे.याबाबतचा अधिक तपास बरड पोलीस दूरक्षेत्राचे सहायक पोलीस फौजदार सुधाकर सुर्यवंशी करत आहेत.