आज दि 19 ला का ष्ट्रा ई महासंघाचे अध्यक्ष अरुण गाडे व महा सचिव एस टी गायकवाड यांचे नेतृत्वात आरोग्य मंत्री प्रा तानाजी सावंत याचे सोबत बैठक सम्पन्न झाली यामध्ये 2016ते 2019पर्यंतच्या सर्व बंध पत्रित नर्सेसना शासकीय सेवेत कायम करण्याचे आदेश मंत्री महोदयांनी दिले. जवळपास 900 बंधपात्रित नर्सेस या कायम स्वरूपी शासकीय सेवेत रुजू होणार….. राज्यातील जवळपास 900 बंध पत्रित नर्सेस चा प्रश्न 2016पासून प्रलंबित होता.2013पासून ते 2015पर्यंतच्या बंध पत्रित नर्सेस यांना सेवेत कायम केले, परंतु 2019ला बंधपत्रित नर्सेस चे बंध पत्र बंद करून या नर्सेस ना कंत्राटीवर नियुक्ती दिली, काष्ट्राईब महासंघाने सातत्याने लढा दिला व 2016ते 2019पर्यंतच्या सर्व नर्सेस यांना सेवेत कायम करावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने लढा दिला. दि 2जुलै पासून आझाद मैदानात बंध पत्रित नर्सेस आंदोलन करित होते, मा आरोग्य मंत्री यांनी आंदोलनाची दखल घेऊन चर्चेला दि 17जुलै ला आमंत्रित केले. परंतु या पूर्वीच्या मंत्री महोदयांनी पूर्वीचे निवेदन सादर karnyaस सांगितले त्यावर आज बैठक झाली व 2015ते 2019पर्यंत च्या नर्सेसना कायम ककरून त्या समंधित RR तयार करून सर्व बंध पत्रित नर्सेस ना शासन सेवेत कायम करण्याचे आदेश दिले.काष्ट्राईब महासंघाचे महासचिव एस टी गायकवाड यांनायापूर्वी आंदोलन प्रसंगी अटक सुद्धा झालीहोती.काष्ट्राइब महासंघाचे अरुण गाडे व महासचिव एस टी गायकवाड यांचे नेतृत्वात आज दि.19रोजी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा तानाजीराव सावंत यांच्या मंत्रालयीन दालनात मंत्रिमंहोद यां च्या अध्यक्ष तेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीला अपर मुख्य सचिव मिलिंद, भा. प्र. से, आयुक्त आरोग्य विभाग धीरजकुमार,IAS, आरोग्य विभाग संचालक डाँ स्वप्नील लाडे, व आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी तसेच बंधपत्रित नर्सेस उपस्थित होते.मंत्री तानाजी सावंत यांनी स्पष्ट व सकारात्मक भूमिका घेतल्या बद्दल त्यांच अध्यक्ष व महासचिव एस टी गायकवाड यांनी पुष्प गुच्छ देऊन मंत्री महोदयांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले.संकलन, सीताराम राठोड






















