महाराष्ट्र न्यूज लोणंद प्रतिनिधी :
भारताच्या सैन्याने पाकिस्तान सैन्याला धुळचारून पाकिस्तानपासुन बांगलादेश स्वतंत्र केल्याची घटना 16 डिसेंबर रोजीचे घडली होती त्याला पन्नास वर्ष पुर्ण झाली होती त्याचे औचित्य साधून लोणंद येथील श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या 41 सदस्यांनी तारकर्ली – मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीने समुद्रामध्ये सुमारे 321 फूट तिरंगा ध्वज फडकाऊन भारतीय सैन्याच्या शौर्याला आगळा वेगळा सलाम करून समुद्रामध्ये विजय दिवस साजरा केला.
समुद्रातील पाण्यामध्ये कोणत्याही देशाचा 321फुट लांब एवढा मोठा ध्वज फडकविण्याची बहुदा पहिलीच वेळ असावी या वेळी भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषाने तारकर्ली – मालवणचा समुद्र किनारा दणाणून गेला होता. अशाच पद्धतीने पीओके ( पाक व्याप्त काश्मिर ) बाबतीत देखील विजय मिळवून आनंद साजरा करण्याची संधी देण्याची भावना व्यक्त केली.
भारतीय सैन्याने दि.16 डिसेंबर 1971 रोजी पाकीस्तानमधील पुर्वी पाकिस्तान असलेल्या आताच्या बांग्लादेशाला स्वांतत्र्य मिळऊन दिले होते . त्यावेळी पासुन 16 डिसेंबर रोजी दरवर्षी देशामध्ये विजय दिवस साजरा केला जातो. याचे औचित्य साधून लोणंद येथील श्री. भैरवनाथ डोंगर मॉर्निंग वॉक ग्रुपचे मार्गदर्शक सदस्य एव्हरेस्टवीर प्राजीत पररेशी यांच्या संकल्पनेतुन डोंगर ग्रुपचे संस्थापक शशिकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप शेळके, हेमंत निंबाळकर , पोनि राजेंद्र शेळके, शंभूराज भोसले, रोहित निंबाळकर ,वरुण क्षीरसागर,रविंद्र धायगुडे , पंकज क्षीरसागर , तानाजी धायगुडे, अनिल क्षीरसागर , राजेंद्र काकडे आदीच्या सहकार्याने तारकर्ली – मालवण जि. सिंधुदुर्ग येथील समुद्रामध्ये 321 फुट तिरंगा ध्वज फडकाऊन भारतीय सैन्य दलाला आगळा वेगळा सलाम करण्यासाठी डोंगर ग्रुपचे 41 सदस्य या उपक्रमात सहभागी झाले.
तारकर्ली – मालवणच्या समुद्रामध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीने सकाळी 7 च्या सुमारास भर समुद्रात अन्वय अंडरवॉटर सव्हिसेसचे रूपेश प्रभू, अन्वय प्रभू,सुमंत लोणे, राजू परब, राशमीन रोगे, नारायण रोगे यांचे सहकार्यानेतीन बोटी व एक स्पीड बोट द्वारे सुमारे तीन किलो मिटर आत मध्ये समुद्रामध्ये गेल्यानंतर 321 फुट लांब व 10 फुट रुंद तिरंगा ध्वज फडकविला.या उपक्रमासाठी अॅडव्हेचर फोटोग्राफर मेहुल ढवळे यांचे सहकार्य लाभले.