महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : फलटण
सातारा जिल्हाधिकारी यांनी कोरोना बाधित रुग्णांसाठी फलटण शहरातील आणखी तीन रुग्णालय अधिग्रहित करण्याची करण्याचे आदेश काढले आहेत. यामध्ये उपजिल्हा रुग्णालय फलटण,साई हॉस्पिटल फलटण, आणि लाईफ लाईन हॉस्पिटल यांचा समावेश आहे.परंतु लाईफ लाईन हॉस्पिटल अधिग्रहित करण्यावर फलटण नगरपालिकेच्या नगरसेविका सुभद्रा राजे नाईक निंबाळकर यांनी तांत्रिक मुद्द्यावर आक्षेप नोंदवला आहे.
लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये सात डायलिसीस मशिन आहेत आणि महिन्याला सुमारे पाचशे डायलिसिस होत असतात.हे हॉस्पिटल अधिग्रहित केल्यास सर्वसामान्य आर्थिक दुर्बल गटातील रुग्णांच्या डायलिसिसचे काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. फलटणमध्ये इतरत्र डायलिसीस मशिन ची कमतरता आहे.
तसेच इतर रुग्णांनाही केव्हाही आपत्कालीन डायलिसिसची गरज भासु शकते. डायलिसिस अभावी रुग्णाचा मृत्यू झाल्यास याची जबाबदार कोणावर ?असा प्रश्न उपस्थित करत आर्थिक दुर्बल गटातील रूग्ण पैशाअभावी किडनी बदलू शकत नाहीत. त्यांना डायलेसिसची गरज असते. याचा जिल्हाधिकारी यांनी विचार करावा असे आवाहन त्यात करण्यात आले आहे. याबद्दल कोणीच बोलत नसल्याने आपण ही भूमिका मांडली असल्याची सुभद्रा राजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे.























