लोणंद शहरातील सातत्याने वाढत असणारी कोविड रूग्णसंख्या आणि राज्य शासनाचा होम आयसोलेशन बंद केल्याच्या पार्श्वभूमीवर लोणंद येथे सुमारे शंभर बेडचे कोविड सेंटर सुरू करत असल्याची माहिती नगरपंचायतीच्या प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी संगीता चौगुले- राजापूरकर आणि नगरपंचायत मुख्याधिकारी हेमंत ढोकले यांनी दिली आहे.
लोणंद नगरपंचायती मार्फत दैनंदिन वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता शरदचंद्र पवार महाविद्यालय लोणंद येथील मूलींचे वसतिगृह येथे १०० बेडची व्यवस्था करण्यातआलेली आहे. या ठिकाणी सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना ठेवण्यात येणार आहे. शासना मार्फत होम आयसोलेशन पुर्ण पणे बंद करणेत आलेले आहे. जे रुग्ण पाॅझीटीव्ह असणार आहेत व ज्यांना सौम्य लक्षणे आहेत अशांना या ठिकाणी आयसोलेट होणे बंधनकारक करणेत आलेले आहे . यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा प्रशासनास कारवाई करण्याबाबत पावले उचलावी लागतील याची नोंद सर्वांनी घ्यावी असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत अनेक तरुणांना व नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत त्यामुळे शासनास होम आयसोलेशन बंद करणे बाबतचा निर्णय घ्यावा लागला आहे , यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर कोविड सेंटरला लोणंद मेडिकल असोसिएशन चे सर्व डाॅक्टर्स विनामुल्य तपासणी करणार आहेत. सर्वांनी कोरोना बाबतीत असणारी नियमावली पाळली तरच आपण व आपले कुटुंबीय सुरक्षित राहू , मास्क वापरणे, सॅनिटायजर तसेच सोशियल डिस्टन्सींग ठेवणे या त्रिसुत्रीचा वापर अत्यंत आवश्यक असल्याचे तसेच नगरपंचायती मार्फत या कोविड सेंटरला लागणाऱ्या आवश्यक बाबींसाठी नागरिकांना मदतीचे आवाहन करणेत आलेले आहे. या कोविड सेंटरची उभारणी करण्यात नगरपंचायतीचे माजी नगरसेवक व पदाधिकारी , सर्व डाँक्टर्स, शहरातील व्यापारी व सर्व सामाजीक संस्था यांचे सहकार्य लाभले आहे.
लोणंद येथे उभारणेत आलेल्या कोविड केअर सेंटरला स्वेच्छेने मदत करण्याचे नागरिकांना केल्या जाहीर आवाहनास नागरिकांचा प्रतिसाद- लोणंद येथील मा.शरदचंद्र पवार महाविद्यालयातील मूलींचे वस्तीगृह येथे १००बेडचे कोरोना केअर सेंटर उभारणेत आले असून यासाठी नागरिकांना स्वेच्छेने मदत करणेचे आवाहन करणेत आले आहे.या आवाहनाला प्रतिसाद देत खालील नागरिकांनी नगरपंचायतीस सहकार्य केले असून या सर्वांचे नगरपंचायत प्रशासनामार्फत विशेष आभार १.) श्री .वसंतराव पेटकर – ३०००/-रु. २)श्री .सिकंदर उर्फ राजूभाई इनामदार – १० गाद्या व आरोग्य साहित्य ३) समस्त गालिंदे परिवार – ५० गाद्या ४) श्री.अरुणशेठ गालिंदे – २५००/-रु. ५) श्री .दिपक जाधव – ५०००/- रु.६) लोणंद मेडिकल असोसिएशन चे सर्व डाँक्टर्स कोविड केअर सेंटरला विनामूल्य सेवा देणार आपणही स्वेच्छेने मदत करावी असे आवाहन करणेत येत आहे.