सातारा: पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम आदमी पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अनेक यशस्वी आंदोलने करणारे देवदूत फौडेशनचे संस्थापक/अध्यक्ष सरदार तथा सागर भोगावकर यांच्या कार्याची दखल घेवून महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
महाराष्ट्र पोलीस त्यांचे कुटुंबिय व सर्वसामान्य ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्यासाठी संघटना कटिबध्द आहे. त्यानुसारच अत्यंत आक्रमक व अभ्यासपूर्ण आंदोलन करणारे सागर भोगावकर यांच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी निवडीने पश्चिम महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांसाठी एक चांगले नेतृत्व मिळालेले आहे. सर्वसामान्य शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, फेरीवाले तसेच कारागीर यांचे प्रश्न शासनदरबारी सोडविण्यासाठी मदत होणार आहे.
या निवडीबद्दल सागर भोगावकर यांचे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल दुबाले, संघटनेच्या महिला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा हसिना शेख, तसेच हॉकर्स संघटेनेचे अध्यक्ष संजय पवार, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अजित जगताप, महारूद्र तिकुंडे, शिवाजी काळभोर, वृक्षवल्ली फौडेशनचे अध्यक्ष शिवाजी जाधव, दिपेंत चिकने, संदिप माने आदी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. तत्पुर्वी हॉकर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव निकम, आरपीआय कामगार चळवळीचे नेते शरद गायकवाड यांना संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. त्यामुळे सदर निवडीचा कार्यक्रम हा शांततेत करण्यात आला.
यापुढे बेकायदेशीर अवैद्य धंदे करणारे तसेच त्याला पाठीशी घालणारे शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करून सामान्य जनतेला कायदा व सुव्यवस्थेबाबत आदर निर्माण व्हावा अशा पध्दतीने कामकाज केले जाईल, असे सागर भोगावकर यांनी निवडीनंतर प्रतिक्रीया दिली.
छायाचित्र ओळी: सागर भोगावकर यांना जिल्हाध्यक्षपदी निवडीचे पत्र देताना संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ.हसिना शेख मॅडम






















