सातारा/प्रतिनिधी
जिल्ह्यात दरररोज कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.त्याप्रमाणात शासकीय रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याने रुग्णांवर उपचार करणे शक्य होत नसल्याने खाजगी रुग्णालये अधिग्रहित करावेत असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. दरम्यान या निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही पाठविण्यात आली होती दरम्यान उपमुख्यमंत्री पवार यांनी उबाळे यांच्या निवेदनाची दखल घेऊन संबंधीत विभागांना कार्यवाही करा आशा सूचना केल्याचे उबाळे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
रमेश उबाळे उपमुख्यमंत्री पवार यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले होते, जिल्ह्यात दररोज ५०० ते६०० कोरोना रुग्ण सापडत आहेत. सदरहू रुग्णांना बेड शिल्लक नसल्याचे निदर्शनास येत आहे.इतर मोठ्या शहरात शासनाने अधिग्रहित केल्याने तातडीने उपचार होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे. याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील खाजगी रुग्णालये अधिग्रहित करून उपचार करणे गरजेचे आहे.
दररोज रुग्ण संख्या वाढत असल्याचे पाहता तेवढे बेड शासकीय रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याने उपचार मिळत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक चिंताग्रस्त आहेत. सध्याचे नियोजित जम्बो कोव्हिड-१९ रुग्णालय हे केवळ २५० बेडचे आहे. जिल्ह्यात दररोज ५०० ते६०० कोरोना रुग्ण नव्याने सापडत आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव शक्य तितक्या लवकर आटोक्यात यायची झाल्यास खाजगी रुग्णालये अधिग्रहित करण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून शासनाने याबाबत गंभीरपणे विचार करून शक्य तितक्या लवकर खाजगी रुग्णालय अधिग्रहित करून बेडची संख्या वाढविणे गरजेचे आहे. असे झाल्यास कोरोना रुग्णांना तातडीचे उपचार मिळून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. असे आमचे म्हणणे आहे.असे निवेदनात नमूद केल्याचेही रमेश उबाळे यांनी नमूद केले होते.
आरोग्य सेवेतील डॉक्टर,अधिकारी व कर्मचारी यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. तसेच सध्या तात्पुरत्या कालावधीकरिता अनेक डॉक्टर, कर्मचारी नियुक्त केल्याचे दिसून येत आहेत. परंतु नियुक्त अधिकारी ७० टक्के कोरोना बाधित झाले आहेत.त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळ कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात येण्याकरिता पुरे पडत नाही. आरोग्य खात्यातील रिक्त पदे तातडीने कायमस्वरूपी भरण्यात यावीत अशीही मागणी उबाळे यांनी केली होती.
चौकट
प्रिय अर्जदार आपले निवेदन ई-मेल द्वारे माझ्या कार्यालयास मिळाला असून सदर निवेदन योग्य त्या कार्यवाहीसाठी प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आले आहे.असे उपमुख्यमंत्री पवार यांनी उबाळे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
उबाळे यांनी मानले उपमुख्यमंत्र्यांचे आभार
मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार प्रभावीपणे काम करत आहेत. आपण पाठविलेल्या निवेदनाची दखल घेऊन अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री पवार यांचे आभार मानून अजितदादा सातारा जिल्ह्याला न्याय देतील असे रमेश उबाळे म्हणाले.