विजयराव गायकवाड यांची कोरेगांव तहसिलदार यांना निवेदानाद्वारे मागणी
कोरेगांव : घिगेवाडी, ता. कोरेगांव, जि. सातारा येथील स्वस्त धान्य दुकानामध्ये गोरगरीबांचे मिळणारे स्वस्त धान्य (गहू-तांदुळ) असे १५ रू. किलो प्रमाणे चोरून विक्री केली जात असणाऱ्या दुकान मालकावरती गुन्हा दाखल करून लायसन्स रद्द करवे असे लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हा अध्यक्ष विजयराव गायकवाड यांनी निवेदनाद्वारे कोरेगांव तहसिलदार यांना मागणी केली.
निवेदनामध्ये म्हटले आहे की, घिगेवाडी, ता. कोरेगांव, जि. सातारा येथील स्वस्त धान्य दुकान लायसन्स नं १२५ दुकान मालक प्रो. प्रा. अशोक नरसिंग सावंत यांनी सोमवार दि. २७ डिसेंबर रोजी दुपारी १२.०० दरम्यान छोटा हत्ती गाडीमधून गोरगरीबांचे मिळणारे स्वस्त धान्य जवळपास ७०० ते ७५० किलो (गहू-तांदुळ) असे मिळून पिंपोड बु॥ मधील श्री राम ट्रेडर्स चे मालक विक्रम महाजन या व्यापाऱ्यास १५ रू. किलो प्रमाणे विक्री केल्याचा प्रत्यक्ष व्हिडीओ आमच्याकडे आला असून या दुकान मालकाचे विरोधात गावातील अनेक लोकांच्या तक्रारी गेले १५ ते २० वर्षांपासून केल्या आहेत.
माञ दुकान मालक पुरावठा विभागातील काही आधिकाऱ्यांना हाताशी धरून बेमालुमपणे आपला चोरीचा व्यवसाय अहव्यादपणेकरीत आहेत. त्याच्याबाबत अनेक लोक तक्रारी करण्याच्या पवित्र्यात असतानाच या व्यक्तिचा धान्य पार्सल करतानाचा व्हिडीओ आल्यामुळे आम्ही आपणास निवेदन करतो की, लायसन्स धारकाच्या नावे घिगेवाडी व्यतिरीक्त भावेनगरमध्ये देखील रेशनिंगचे दुकान त्यांचे नावे असल्याची माहिती आम्हास मिळाली आहे. आपण या स्वस्त धान्य दुकानदार मालकाची चौकशी करून गोरगरीबांचे धान्य खाणाऱ्या चोरांवरती चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी व त्यांची दोन्ही दुकानांचे लायसन्स त्वरीत रद्द करावे व सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काचे रेशनिंग मिळण्याकरिता सहकार्य करावे.
या प्रकरणी सर्वसामान्यांना त्वरीत न्याय मिळाली नाही व दुकान मालकावरतील फौजदारीच्या गुन्ह्यास विलंब केल्यास सोमवार दि. ३ जानेवारी २०२२ रोजी आपल्या कार्यालयाच्या विरोधात लोकजनशक्ती पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या व ग्रामस्थ घिगेवाडी यांच्या उपस्थीतीत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील, असे लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हा अध्यक्ष विजयराव गायकवाड यांनी निवेदनाद्वरे कोरेगांव तहसिलदार यांच्याकडे मागणी केली आहे.
































