कराड : पुढील पाच वर्षांमध्ये शासनाच्यावतीने राज्यामध्ये ८ ते १० लाख रोजगार निर्मितीचे लक्ष असुन नवीन उद्योजकांना महाराष्ट्र उद्योग विकास केंद्रामार्फत मार्गदर्शन केले जाते. या मार्गदर्शनाचा लाभ युवकांनी घ्यावा, तसेच युवकांनी शेतीबरोबरच जोड व्यवसाय म्हणून उद्योगाकडे वळावे असे आवाहन शिवसेना कराड उपतालुकाप्रमुख काकासाहेब जाधव यांनी केले.
चचेगाव (ता.कराड) येथे नुतन दुध संकलन केंद्राचे उद्घाटन काकासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी चचेगावचे सरपंच महेश पवार, उपसरपंच तानाजी थोरात, काका बोडरे,शिवसेना विभाग प्रमुख प्रविण लोहार, शाखाप्रमुख कृष्णाजी बोडरे, उपशाखाप्रमुख सुरज पवार, चचेगावचे तंटामुक्ती अध्यक्ष गणेश पवार, पकंज जाधव, कुलदीप कदम, टिपू चव्हाण, दिपक थोरात, आनंदा दगडे, अमृत पवार, सागर भोसले, चचेगावचे पोलीस पाटील प्रशांत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना काकासाहेब जाधव म्हणाले, व्यवसायीकांना शासनाच्या सर्व योजनांची माहिती व लाभ मिळण्यासाठी महा-डीबीटी पोर्टल सुरू केले आहे. त्याचप्रमाणे सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून लाभ घेता येतो. तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजना, सामुहिक प्रोत्साहन योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, जिल्हाउद्योग केंद्र कर्ज योजना अशा विविध योजना असून यांना वित्तीय सहाय्य मिळते.कोरोना महामारी लॉकडाऊनमुळे खचून न जाता शासनाच्या नियमांचे पालन करून मिशन बिगीन अगेन अंतर्गत सर्व व्यवसाय सुरू झाले, असून युवकांनी याचा लाभ घेतला पाहिजे. असे आवाहनही यावेळी काकासाहेब जाधव यांनी केले. कार्यक्रमास पंचक्रोशीतील ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते.