महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (सातारा): राहुल ताटे-पाटील
सातारा रहिमतपूर रस्त्यावर गोजेगाव नजीक नव्याने चालू झालेल्या गोजेगाव येथील घोरपडे बंधूंचे रामकृष्ण पेट्रोलियम पंपाचे उद्घाटन ह. भ .प माऊली गोजेगावकर महाराज यांच्या शुभहस्ते पार पडले. देश सेवेतून निवृत्त झालेले घोरपडे बंधू यांनी निवृत्तीनंतर सेवा व्यवसाय देणाऱ्या उद्योग व्यवसायावर लक्ष केंद्रित करून ग्रामीण भागातील लोकांना केंद्रस्थानी धरून आपल्या या गावानजीक रामकृष्ण पेट्रोलियम ची उभारणी करून गुणवत्तापूर्वक सेवा देण्याचे काम चालू केले आहे.
या पेट्रोल पंपा मुळे सातारा रहिमतपूर प्रवाशांबरोबरच, गोजेगाव, तासगाव पंचक्रोशी, चिंचणेर, जैतापूर, तांदुळवाडी, जाधववाडी, जिहे, कठापूर, अंगापूर, विजयनगर, धामणेर, सासुर्वे, इत्यादी भागातील नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.




















