महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
शासनाचे संच मान्यतेचे नवीन परिपत्रक राज्यातील माध्यमिक शाळांना अडचणीचे ठरणार असल्याने त्याला विरोध करीत ते परिपत्रक रद्द करण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. शालेय शिक्षण विभागाने 13 जुलै रोजी संच मान्यतेचे नवीन निकष जाहीर करणारे परिपत्रक काढले आहे. ते निकष जाचक आहेत असे शिक्षक संघटनांनी सांगितले आहे.
पूर्वी इयत्ता निहाय 4 गटांसाठी संच मान्यता दिली जात होती. आता विद्यार्थी संख्ये नुसार दोन गट निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील मराठी माध्यमाच्या अनेक शाळा बंद पडण्याची भीती पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघासह शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे. नवीन परिपत्रकामुळे अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढणार आहे. तसेच कला क्रीडा व कार्यानुभव विषयांच्या शिक्षकांवर अन्याय होणार आहे.या नवीन परिपत्रकात 28 ऑगस्ट 2015 रोजीच्या सेवक संच मान्यतेचा निकषांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा होती. परंतु या नव्या परिपत्रकामुळे ती पूर्ण झालेली नाही. त्यामुळे राज्यभर शिक्षक संघटनांनी या संचमान्यता परिपत्रकाला विरोध करणारे निवेदन वरिष्ठ अधिकार्यांना दिले आहे.






















